शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 16:38 IST

"मार्चनंतरच्या आपल्या १५५ प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २९४२ वेळा 'काँग्रेस' शब्दाचा वापर केला. तर २८६२ वेळा..."

लोकसभा निवडणूक २०२४ मधील पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या भाषणांचे विश्लेषण करून काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या १५ दिवसांच्या प्रचारसभांमध्ये ‘मंदिर’ ४२१ वेळा उच्चारला, ‘मोदी’ शब्द ७५८ वेळा उच्चारला. ‘मुसलमान’, ‘पाकिस्तान’ आणि ‘अल्पसंख्यक’ हे शब्द २२ ४ वेळा उच्चारले. याशिवाय, २३२ वेळा काँग्रेसचा उल्लेख केला, तर ५७३ वेळा I.N.D.I.A. आणि विरोधीपक्षांचा उल्लेख केला. मात्र महंगाई आणि बेरोजगारीसंदर्भात एकदाही भाष्य केले नाही. यावरून स्पष्ट होते की, त्यांनी महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवले आणि प्रचारात केवळ स्वतःविषयीच बोलले,' असा दावा काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तर जाणून घेऊयात त्यांच्या १५५ सभांसंदर्भात...

पंतप्रधान मोदींनी हजारोवेळा वापरले हे दोन शब्द - 'क्विंट'च्या एका वृत्तानुसार, मार्चनंतरच्या आपल्या १५५ प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २९४२ वेळा 'काँग्रेस' शब्दाचा वापर केला. तर २८६२ वेळा स्वतः आपल्या नावाचा अर्थात 'मोदी' शब्दाचा वापर केला.

कोणत्या शब्दाचा कितीवेळा केला वापर? - काँग्रेस: ​​२९४२मोदी:   २८६२खराब:  ९ ४९SC/ST/OBC: ७८०विकास: ६३३इंडिया ब्लॉक: ५१८मोदीची गॅरंटी: ३४२भ्रष्टाचार: ३४१मुसलमान: २८६महिला: २४४राम मंदिर: २४४विकसित भारत: ११९पाकिस्तान: १०४घराणेशाही: ९१नोकऱ्या: ५३विरोधी पक्ष: ३५आत्मनिर्भर भारत: २३अमृत ​​काळ: ४

या ५ मुद्द्यांवर विरोधकांना घेरलं? -आणखी एका विश्लेषणानुसार, 'काँग्रेसमधील घराणेशाही', 'पाकिस्तान', 'भ्रष्टाचार', 'वारसा कर' आणि 'मोदीची गॅरंटी' या पाच शब्दांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षासह संपूर्ण I.N.D.I.A. ला आपल्या जाळ्यात अडकवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील भाषणांवर नजर टाकली, तर त्यांनी प्रत्येक टप्प्यात नव-नवीन मुद्दे उपस्थित केल्याचे दिसते आणि विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र त्यांचे हे चक्रव्यूह भेदण्यात विरोधकांना किती यश आले? हे चार जूनला स्पष्ट होईल. 

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३८, दुसऱ्या टप्प्यात १६, तिसऱ्या टप्प्यात ३६, चौथ्या टप्प्यात १८, पाचव्या टप्प्यात १८, सहाव्या टप्प्यात १९ आणि सातव्या टप्प्यात १० रॅली, प्रचारसभा घेतल्या.

भाजपचा पलटवार - काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेवर भाजप नेत्यांनी पलटवार करत, काँग्रेस अशा गोष्टी बोलून आपली हताशा आणि निराशा लपवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जनतेने पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस