शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर! मोदी वाराणसी, शाह गांधीनगर; २८ महिलांनाही संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 6:40 PM

१९५ उमेदवारांच्या पहिल्या यादीतील ३४ उमेदवार हे विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री

BJP first List for Lok Sabha Elections 2024, Pm Modi: देशात काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दिल्लीत झालेल्या भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीनंतर आज अखेर १९५ जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून लढणार आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. १९५ उमेदवारांपैकी ३४ उमेदवार हे विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री असणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचाही नावात समावेश आहे. याशिवाय, दोन माजी मुख्यमंत्री, २८ महिला आणि ५० पेक्षा कमी वयाचे युवा ४७ उमेदवार असतील अशी माहिती विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोणत्या राज्यातील किती नावे?

भाजपच्या १९५ जणांच्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 11, दिल्लीतून 5, जम्मू-काश्मीरमधून 2, उत्तराखंडमधून 3, अरुणाचल प्रदेशमधून 2 आणि गोवा, त्रिपुरा, अंदमान व निकोबार आणि दमण आणि दीवमधून प्रत्येकी एकाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाचे बडे नेते आणि त्यांचे मतदारसंघ

पंतप्रधान नरेंद्र मोदी- वाराणसीअमित शाह- गांधीनगर (गुजरात)शिवराज सिंह चौहान- विदिशा (मध्य प्रदेश)स्मृती इराणी- अमेठी (उत्तर प्रदेश)संरक्षण मंत्री राजनाथ सिंह- लखनौ (उत्तर प्रदेश)बन्सुरी स्वराज (सुषमा स्वराज यांच्या कन्या)- नवी दिल्लीहेमा मालिनी- मथुरा (उत्तर प्रदेश)आरोग्यमंत्री मनसुख मांडविय- पोरबंदरमधून (गुजरात)विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया- गुना (मध्य प्रदेश)किरन रिजिजू, तापीर गाओ- अरुणाचल प्रदेशपर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव- अलवर (राजस्थान)केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन- अटिंगलकेंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर- तिरुअनंतपुरमकमलजीत सेहरावत- पश्चिम दिल्लीरामवीर सिंग बिधुरी- दक्षिण दिल्लीप्रवीण खंडेलवाल- चांदनी चौक (दिल्ली)मनोज तिवारी- ईशान्य दिल्लीमाजी मुख्यमंत्री बिप्लब देब- त्रिपुराआसामचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल- दिब्रुगड

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाElectionनिवडणूकshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह