शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 :"आगे, आगे देखो होता...", नितीश कुमारांसोबत एकाच विमानातून प्रवासानंतर तेजस्वी यादवांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 18:34 IST

Lok Sabha Election Result 2024 : आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकाच विमानातून प्रवास केला. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. एनडीएला बहुमत मिळाले आहे, तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे.  एनडीएचे सरकार स्थापन करण्यामध्ये आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंची महत्वाची भूमिका असणार आहे. दरम्यान, आज सकाळी नितीश कुमार आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एकाच विमानात प्रवास केल्याचे फोटो व्हायरल झाले. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. 

NDA or INDIA एनडीए की इंडिया? तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला मोठा निर्णय

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता विमानात नेमकं काय बोलण झालं, याबाबत तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोनंतर नितीश कुमार पुन्हा एकदा इंडिया आघाडीसोबत येऊ शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आज माध्यमांनी तेजस्वी यादव यांना प्रश्न विचारले. यावर बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, 'थोडा धीर धरा, नमस्कार, प्रणाम एवढे बोलणे झाले, पण पुढे काय होते ते पाहा, असं सूचक विधान तेजस्वी यादव यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

"एनडीए'कडे जास्त संख्याबळ आहे, पण आम्हाला वाटतं जे सरकार होईल ते सरकार बिहारकडे लक्ष द्यावे. आमचं बिहारमध्ये सरकार होतं तेव्हा आम्ही ७५ टक्के आरक्षणाच्या सीमेसाठी प्रस्ताव केला होता. त्या आरक्षणाला सरकारने शेड्युल नऊ मध्ये टाकावे, असंही तेजस्वी यादव म्हणाले. आता नितीश कुमार किंग मेकरच्या भूमिकेत आहेत, तर आता त्यांनी बिहारला विशेष राज्य म्हणून मान्यता मिळवून द्यावी. तसेच त्यांनी जातीय जनगणना करुन घ्यावी, असंही तेजस्वी यादव म्हणाले. 

एकाच विमानाने प्रवास

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या दोन्ही गटांनी आपापल्या सहकारी पक्षांना सरकार स्थापनेच्या मोर्चेबांधणीसाठी बोलविले आहे. याच नितीशकुमार यांना दोन्ही गटांनी संपर्क साधला आहे. आता नितीश कुमार हे अत्यंत महत्वाकांक्षी असल्याने ते चांगली ऑफर ज्याची असेल त्याच्याकडे उडी मारण्याची शक्यता आहे. 

नितीशकुमार यांच्या पाठीमागील जागेवर तेजस्वी बसलेले आहेत. या दोघांच्या चेहऱ्यावर हसू आहे. यावरून काही खेळ रंगणार नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेस