शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

Lok Sabha Election Result 2024 : दशकभरानंतर काँग्रेसने गुजरातमध्ये आपले खाते उघडले; 'या' जागेवर भाजपचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 19:52 IST

Lok Sabha Election Result 2024 : देशभरात लोकसभेचे निकाल समोर आले आहेत. एनडीए पुन्हा एकदा बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. तर दुसरीकडे, गुजरातमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : देशभरात लोकसभेचे निकाल समोर आले आहेत. एनडीएने पुन्हा एकदा बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. तर दुसरीकडे, गुजरातमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुजरातच्या २५ जागांचे निकाल समोर आले आहेत. भाजप २४ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसनेही एका जागेवर विजय मिळवला आहे. यासह गुजरातमध्ये दशकभरानंतर काँग्रेसचे खाते उघडले आहे.

“गरीब जनतेने संविधान वाचवले, मोदींचा पराभव दिसताच अदानींचे शेअर पडले”: राहुल गांधी

बनासकांठामध्ये काँग्रेसच्या उमेदवार गेनीबेन नागजी ठाकोर ३३४१३ मतांनी आघाडीवर असून त्यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. रेखाबेन यांचा पराभव केला आहे. याशिवाय पाटणच्या जागेवरही काँग्रेसने भाजपला कडवी टक्कर दिली. मात्र, आता भाजपचे उमेदवार २९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

दुसरीकडे, गृहमंत्री अमित शहा यांचा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून ६ लाख ७५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. नवसारी जागेवर सीआर पाटील, पोरबंदर जागेवर मनसुख मांडविया, राजकोट जागेवर परशोत्तम रुपाला, अहमदाबाद पूर्व जागेवर हसमुखभाई पटेल, अहमदाबाद पश्चिम जागेवर दिनेशभाई मकवाना, अमरेली जागेवर भरतभाई सुतारिया आणि आनंद जागेवर मितेश पटेल हे भाजपचे इतर प्रमुख उमेदवार आहेत. 

बनासकांठामध्ये काँग्रेसच्या उमेदवार गेनीबेन ठाकोर यांची आघाडी कायम राहिल्यास भाजपची यावेळी क्लीन स्वीपची हॅटट्रिक चुकणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २६ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या.

सुरत लोकसभा मतदारसंघातून २२ एप्रिल रोजी काँग्रेस उमेदवाराचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्यानंतर आणि इतर पक्ष आणि अपक्षांसह आठ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवाराला बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. 

याशिवाय राज्य विधानसभा पोटनिवडणुकीत पोरबंदर मतदारसंघातून भाजपचे अर्जुन डी मोधवाडिया विजयी झाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी २०१९ मध्ये ६४.११ टक्के आणि २०१४ मध्ये ६३.९ टक्के होती. २०१९ आणि २०१४ मध्ये भाजपने सर्व २६ जागा जिंकल्या होत्या. त्यापूर्वी २००९ च्या निवडणुकीत भाजपला १४ तर काँग्रेसला १२ जागा मिळाल्या होत्या.

टॅग्स :gujarat lok sabha election 2024गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस