शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : हाताच्या जाेरावर ‘सपा’ची सायकल सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:32 IST

Lok Sabha Election Result 2024: मोदी-योगी जादू चालली असती तर विरोधकांना एवढे यश मिळाले नसते. एकूणच या निवडणुकीच्या निकालाने यूपीतील मोदी-योगी जोडीला मोठा धक्का बसला आहे.

- राजेंद्र कुमारलखनौ : '४०० पार'चा नारा देत देशातील सर्वाधिक ८० लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपचे बडे नेते मोदी-योगी यांची जादू चालली नाही. उत्तर प्रदेशातील राजकुमार असा भाजपच्या नेत्यांनी उल्लेख केलेल्या अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा विजय रथ रोखला. त्यामुळे उत्तर प्रदेशात सर्व ८० जागा जिंकण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला केवळ ३६ जागा मिळाल्या आहेत, तर सपा आणि काँग्रेसने ४३ जागांवर मजल मारली आहे. यामध्ये सपा ३७ जागांवर, तर काँग्रेस ७ जागांवर जिंकली आहे. येथे मायावतींच्या बसपा पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

मोदी-योगी जादू चालली असती तर विरोधकांना एवढे यश मिळाले नसते. एकूणच या निवडणुकीच्या निकालाने यूपीतील मोदी-योगी जोडीला मोठा धक्का बसला आहे. यूपीमध्ये अखिलेश-राहुल जोडीला हलक्यात घेण्याचा आणि जनतेप्रती उदासीनता दाखविणाऱ्या सर्व खासदारांना मैदानात उतरवण्याचा अतिआत्मविश्वास भाजपला महागात पडल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अखिलेश आणि राहुल यांनी ज्या प्रकारे पीडीए (मागास आणि अल्पसंख्याक) फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक जागेवर उमेदवार उभे केले, त्यामुळे त्यांना भाजपवर दबाव आणण्याची संधी मिळाली. जनतेनेही महागाई, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांवर मौन बाळगणाऱ्या  सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

विरोधक का जिंकले?-    यावेळी अखिलेश आणि राहुल यांनी मागासवर्गीय कार्डावर डाव खेळला. पीडीएचा फॉर्म्युला, जात जनगणना, आरक्षण आणि संविधान, बेरोजगारी हे मुद्दे मांडण्यात आले. हा डाव यशस्वी झाला.-    यावेळी काँग्रेस आणि सपाने मुस्लिम मते मिळवण्यासाठी अत्यंत संयमाने काम केले. मुस्लिम उमेदवारांना तिकीट देताना खबरदारी घेण्यात आली. या पक्षांच्या मुस्लिम उमेदवारांनीही प्रक्षोभक वक्तव्ये करण्यापासून स्वतःला दूर ठेवले. त्याचा फायदा असा झाला की, बसपाने २२ मुस्लिम उमेदवार उभे केल्यानंतरही मुस्लिम मतांचे विभाजन झाले नाही.-    काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांनी एकत्र प्रचार केला. प्रचारापासून ते मतदानापर्यंत त्यांनी स्थापन केलेल्या समन्वय समित्यांमध्ये जम बसवला. आप आणि डावे पक्षही एकत्र आले. त्याचा परिणाम झाला आणि इंडिया आघाडीची मते विभागली गेली नाहीत.-    उत्तर प्रदेशात भाजपबद्दल जनतेचा भ्रमनिरास होण्याचे एक कारण म्हणजे भाजपच्या उमेदवारांबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी.

या विजयाने काय होईल?-    आता यूपीचे राजकारण बदलणार आहे.-    काँग्रेस आणि सपा मिळून आता भाजपच्या धोरणांना धारेवर धरतील.-    महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर राजकारण होणार आहे.-    भाजप सरकारने संस्थांवर निर्माण केलेला दबाव विरोधकांमुळे कमकुवत होणार आहे.-    गरीब, शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर योगी सरकारला कोंडीत पकडणे सुरू होईल.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Samajwadi Partyसमाजवादी पार्टी