शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'नितीश कुमार NDA मध्येच राहतील', JDU नेत्याने इंडिया आघाडीसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 15:30 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Lok sabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. 400 पारचा दावा करणाऱ्या भाजपला 300 चा आकडा पार करणेही कठीण बनले आहे. सत्ता भाजपची येईल, पण त्यांना नितीश कुमार (Nitish Kumar) आणि चंद्राबाबू नायडू यांची साथ लागणार आहे. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. त्यांनाही बहुमतासाठी मित्रपक्षांची गरज भासणार आहे. अशातच, काँग्रेसनितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण, नितीश कुमार NDA मध्येच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नितीश कुमार एनडीएमध्ये आहेत आणि एनडीएमध्येच राहतील, असे जेडीयूने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान जेडीयू नेते केसी त्यागी यांनी निवडणुकीच्या निकालानंतर जेडीयू इंडिया आघाडीसोबत जाण्याची शक्यता पूर्णपणे नाकारली आहे. मीडियाशी बोलताना केसी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार एनडीएमध्ये राहतील. आता आम्ही कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी निवडणुकीदरम्यानच स्पष्ट केले होते. त्यामुळे ते इंडिया आघाडीत जाण्याचे वृत्त खोटे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बिहारमध्ये एनडीएची आघाडीबिहारमधील 40 जागांपैकी एनडीए 34 जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी जनता दल युनायटेड 15 जागांवर तर भाजप 13 जागांवर पुढे आहे. याशिवाय चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष 5 जागांवर अन् जीतन राम मांझी एका जागेवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीतील आरजेडी 3 जागांवर तर काँग्रेस आणि डावे तीन जागांवर पुढे आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेस