शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 19:01 IST

Mallikarjun Kharge Remarks: इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

Mallikarjun Kharge On INDIA Alliance PM Face: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण, अद्याप विरोधकांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

मल्लिकार्जुन खर्गे बुधवारी(1 नोव्हेंबर) छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सुकमा जिल्ह्यात निवडणूक रॅलीसाठी पोहोचले होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पंतप्रधानपदाबाबत विचारणा झाली. यावर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले की, आमची सत्ता आल्यानंतर सर्वजण बसून निर्णय घेणार आहोत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

निवडणुकीतील मुद्दे काय असतील?छत्तीसगडमध्ये काँग्रेससाठी निवडणुकीचा मुद्दा काय आहे, असे विचारले असता काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, प्राथमिक ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मदत करू, महिलांना स्वस्त सिलिंडर देऊ. मुख्यमंत्री कोण असेल? असे विचारले असता खर्गे म्हणाले, त्यावेळी निवडून येणारे आमदार ठरवतील. दरम्यान, छत्तीसगडमध्ये 75 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मोदी सरकारवर निशाणा यावेळी सभेला संबोधित करताना काँखर्गेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस दिलेली आश्वासने पूर्ण करणार. काँग्रेसने विमानतळे आणि कारखाने बांधले, भाजपने ते श्रीमंतांना विकले. आपण सर्वांनी मिळून मोठ्या मेहनतीने हा देश उभा केला आहे. देशाची संपत्ती विकणारा माणूस देशाच्या कल्याणाचा विचार करत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक