शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:28 IST

Lok Sabha Election 2024: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला होता. त्यावरून आता भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या एका विधानावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तानभारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला होता. त्यावरून आता भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही, असा इशारा भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी दिला आहे.  मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यााबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. अय्यर हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ही काँग्रेसची दुतोंडी मंडळी आहे. आज भारत शक्तिशाली आहे. तसेच जर पाकिस्ताननं डोळे वटारण्याचा प्रयत्न केलाच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. सध्या कांग्रेसचे लोक दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत, अशी टीका गिरिराज सिंह यांनी केली.  

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकून यांनीही मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर टीका केली आहे. मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामधून काँग्रेसच्या मनातील भीती आणि दहशत दिसत आहे. हे विधान म्हणजे काँग्रेसचं पाकिस्तान प्रेम आहे. काँग्रेसचे नेते राहतात भारतात पण त्यांच्या मनात मात्र पाकिस्तान भरलेला आहे. पाकिस्तानमध्ये आता काही दम राहिलेला नाही. पाकिस्तानला कसं सरळ करायचं, हे भारताला माहिती आहे, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. 

तर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या निवडणुकीत राहुल गांधी यांची विचारसरणी पूर्णपणे उघड झाली आहे. पाकिस्तानचं समर्थक करा, दहशतवाद्यांशी संबंधित संघटनांचं समर्थन करा. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि लूट करा, हेच काँग्रेसचे धोरण आहे, असा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी केला.  

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानबाबत बोलताना मणिशंकर अय्यर म्हणाले होते की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, हे आपण विसरून चालणार नाही. सध्या देशात सत्तेवर असलेलं सरकार आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही असं का सांगत आहे हे मला कळत नाही आहे.  तिथे दहशतवाद असल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असं सरकार का सांगतंय. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी चर्चा खूप आवश्यक आहे. अन्यथा भारत आपल्या अहंकारापायी जगभरात पाकिस्तानलला कमीपणा देतोय, असं पाकिस्तानला वाटू शकतं. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील कुठलाही माथेफिरू त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करू शकतो, अशी भीती मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केली होती.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारतPakistanपाकिस्तान