शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 06:32 IST

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल फाजील आत्मविश्वास बाळगलेले भाजप कार्यकर्ते आणि अनेक पक्षनेत्यांना आरसा दाखविणारे आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाने म्हटले आहे.

 नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल फाजील आत्मविश्वास बाळगलेले भाजप कार्यकर्ते आणि अनेक पक्षनेत्यांना आरसा दाखविणारे आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाने म्हटले आहे. नेते आणि कार्यकर्ते आपल्या भ्रमात मश्गूल होते आणि पंतप्रधानांनी सामान्य जनतेच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले, असेही या साप्ताहिकाने म्हटले.

आरएसएस भाजपची बूथस्तरीय शक्ती नसेल. मात्र, पक्षाने निवडणुकीत स्वयंसेवकांशी साधा संपर्कही केला नाही. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे निकालांवरून दिसून येते, असे लेखात म्हटले आहे.   

त्यांच्या लक्षातच आले नाही...‘२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हे फाजील आत्मविश्वास बाळगलेले भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी आरसा दाखवणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० हून अधिक जागांचे केलेले आवाहन हे त्यांच्यासाठी (पक्ष कार्यकर्ते आणि नेते) लक्ष्य आणि विरोधकांसाठी आव्हान आहे, हे त्यांच्या लक्षातच आले नाही,’ असे आरएसएसचे आजीवन सदस्य असलेले रतन शारदा यांनी या लेखात नमूद केले आहे.  

कठोर मेहनत करून ध्येय गाठले जाते- लोकसभा निवडणुकीत २४० जागांसह भाजप बहुमतापासून दूर राहिला. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) २९३ जागांसह बहुमत प्राप्त झाले आहे. काँग्रेसला ९९, तर ‘इंडिया’ आघाडीला २३४ जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर विजयी झालेल्या दोन अपक्ष उमेदवारांनीही काँग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. nत्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांची संख्या २३६ झाली आहे. ‘सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून नाही, तर कार्यक्षेत्रात कठोर मेहनत करून ध्येय गाठले जाते’, असेही शारदा म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ