शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
3
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
4
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
5
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
6
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
7
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
8
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
9
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
10
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
11
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
12
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
13
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
14
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
15
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
16
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
17
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
18
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
19
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"

आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 7:10 PM

भाजप सरकार संविधान संपवण्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत असते.

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. या प्रत्येक सभेतून ते विरोधकांवर सातत्याने टीका करत आहेत. शुक्रवारी(दि.12) त्यांनी राजस्थानच्या बारमेरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेबाबतही विरोधकांना फैलावर घेतले. 

भारताला शक्तिहीन बनवण्यासाठी आघाडीकाँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप दिसते. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या आणखी एका पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात देशाविरोधात घोषणा केली. ते भारताची अण्वस्त्रे नष्ट करू इच्छितात. आपले दोन शेजारी अण्वस्त्रांनी सज्ज असताना आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत? ही कोणती आघाडी आहे, जी भारताला शक्तीहीन बनवू इच्छिते...तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून काम करत आहात? हे लोक देशाच्या सीमावर्ती गावांना देशाची शेवटची गावे म्हणतात. त्यांनी जाणीवपूर्वक सीमावर्ती जिल्हे व गावे विकासापासून वंचित ठेवली. सीमाभाग आणि सीमावर्ती गावांना आम्ही शेवटची गावे मानत नाही, तर देशातील पहिली गावे मानतो. आमच्यासाठी देशाच्या सीमा इथे संपत नाहीत, आमच्यासाठी देश इथून सुरू होतो, असेही मोदी म्हणाले.

रामायण-कुराण हे आमच्यासाठी संविधान सरकार संविधान बदलणार, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होते. यावरुनही मोदींनी टीका केली. पीएम मोदी म्हणाले, 400 पारची चर्चा होत आहे, कारण तुम्ही मला दहा वर्षे चांगले काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. देशातील जनतेला तुम्हाला शिक्षा द्यायची आहे. तुम्ही संविधानाबाबत नेहमी खोटं बोलता. मी लिहून देतो की, स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले, तरीदेखील ते संविधान रद्द करू शकत नाहीत. आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान आहे. ही निवडणूक लोकशाही मजबूत करणारी निवडणूक आहे. काँग्रेसने देशावर 5 दशकांहून अधिक काळ राज्य केले, पण कोणत्याही समस्येवर योग्य तोडगा काढला नाही. काँग्रेसची विचारसरणी नेहमी विकासविरोधी राहिली आहे.

राष्ट्रहिताच्या कामाला काँग्रेसचा विरोधज्यांना काँग्रेसने कधीच विचारले नाही, त्या लोकांना मोदी विचारतो. आपल्या आदिवासी समाजातील मुलांच्या प्रगतीसाठी आम्ही एकलव्य मॉडेल निवासी शाळा उघडत आहोत. आदिवासी समाजाला सिकलसेल ॲनिमियापासून मुक्त करण्यासाठी आम्ही मोहीम राबवत आहोत. राष्ट्रहिताच्या प्रत्येक कामाला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेस देशविरोधी असलेल्या प्रत्येक शक्तीसोबत उभी आहे. राम मंदिर उभारण्याचे पवित्र कार्य होते, काँग्रेस त्यावर बहिष्कार टाकते, राजस्थानमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक केली जाते आणि काँग्रेस दंगलखोरांना संरक्षण देते. घुसखोर देशात येतात, तेव्हा काँग्रेस त्यांचे स्वागत करते. भारताच्या फाळणीला विरोध करणाऱ्या दलित आणि शीख बांधवांना नागरिकत्व देणाऱ्या CAA ला त्यांचा विरोध आहे. ही नेमकी कोणती आघाडी आहे, जी देशविरोधी काम करते, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४rajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४