शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 09:07 IST

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: इंदूरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम हे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आधी मतदान केंद्रांवर कब्जा केला जायचा आता विरोधी उमेदवारांवरच कब्जा केला जात आहे, अशी टीका जितू पटवारी यांनी केली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडूनभाजपाला कडवी टक्कर मिळत आहे. मात्र गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दोन मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनाच आपल्या पक्षात खेचत भाजपाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, इंदूरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम हे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आधी मतदान केंद्रांवर कब्जा केला जायचा आता विरोधी उमेदवारांवरच कब्जा केला जात आहे, अशी टीका जितू पटवारी यांनी केली आहे. 

भाजपावर घणाघाती टीका करताना जितू पटवारी म्हणाले की, सध्या देशात राजकीय माफिया फोफावत आहेत. आधी मतदान केंद्रांवर कब्जा केला जायचा आता विरोधी उमेदवारांवरच कब्जा केला जात आहे. इंदूरमध्ये जे काही घडले ते कलंकित करणारे आहे. जितू पटवारी यांनी याआधीही अक्षय बम यांना धमकावण्यात येत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने इंदूर लोकसभा मतदारसंघातून अक्षय कांती बम यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपामध्ये प्रवेस केला होता. 

अक्षय बम यांनी याआधी कुठलीही निवणडणूक लढवलेली नव्हती. त्यांच्यावर तीन वेगवेगळे खटले सुरू आहेत. बम यांनी शपथपत्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता. तसेच बम यांनी त्यांची एकूण संपत्ती ५७ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. व्यावसायिक असलेल्या बम यांनी त्यांचं वार्षिक उत्पन्न २.६३ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. इंदूर लोकसभा मतदारसंघामधून एकूण २३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामधील ९ उमेदवारांनी आपलं नाव मागे घेतलं होतं. त्यामुळे आता इंदूर लोकसभेसाठी १४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.  

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४indore-pcइंदौरcongressकाँग्रेसBJPभाजपा