शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जातिनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये मतभेद, बड्या नेत्याने खर्गेंना पत्र लिहून राहुल गांधींना घेरले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 18:29 IST

Lok Sabha Election 2024: मागच्या काही काळापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) जातिनिहाय जनगणनेबाबत (caste-based census) आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या या भूमिकेला आता काँग्रेस (Congress) पक्षामधूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी राहुल गांधी यांच्या जातिनिहाय जनगणनेबाबतच्या विधानावर टीका करत नराजी व्यक्त केली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी हे जातिनिहाय जनगणनेला प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा बनवण्याची शक्यता आहे. मागच्या काही काळापासून राहुल गांधी जातिनिहाय जनगणनेबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या या भूमिकेला आता काँग्रेस पक्षामधूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या जातिनिहाय जनगणनेबाबतच्या विधानावर टीका करत नराजी व्यक्त केली आहे. 

आनंद शर्मा यांनी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रामधून आनंद शर्मा यांनी जातिनिहाय जनगणना हा काही रामबाण उपाय नसल्याचे म्हटले आहे. तसेच असं करणं म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या वारशाच्या अपमान करण्यासारखं ठरेल, असंही आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आनंद शर्मा यांनी काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि व्यापक दृष्टीकोनाची आठवण काढताना या पत्रामधून इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी दिलेल्या घोषणांचेही उदाहरण दिले. पक्षाची सध्याची भूमिका ही मागच्या काँग्रेस सरकारच्या विचारसरणीसोबत जुळत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधकांना चिखलफेक करण्याची संधी मिळणार आहे, असे आनंद शर्मा यांनी सांगितले. तसेच त्यांनी १९८० मध्ये काँग्रेसने दिलेल्या ‘ना जात पर ना पात पर, मुहर लगेगी हातपर’ या घोषणेचाही हवाला दिला.

या पत्रामधून आनंद शर्मा यांनी राजीव गांधी यांच्या एका वक्तव्याचंही उदाहरण दिलं आहे. त्यात १९९० मध्ये विरोधी पक्ष नेते असलेले राजीव गांधी यांनी सांगितले होते की, जर आपल्या देशात जातिवाद प्रस्थापित करण्यासाठी जातीची व्याख्या केली जात असेल, तर त्यापासून आम्हाला अडचण आहे. जर संसदीय आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जातिवाद हा एक विषय बनला तर त्यामुळे आपल्यासाठी समस्या निर्माण होतील. अशा परिस्थितीत काँग्रे बघ्याची भूमिका घेऊन या देशाचं विभाजन होत असलेलं बघत राहू शकणार नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे