शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 11:30 IST

काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेला तयार असल्याचे जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रचारसभा सुरू आहेत. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. दरम्यान, काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले होते. यावर आता भाजपाने प्रत्यु्त्तर दिले आहे.  

राहुल गांधी ट्विट करुन म्हणाले की, मला किंवा पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे लोकसभा निवडणुकीवरील सार्वजनिक चर्चेत भाग घेण्यास आनंद होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीही निमंत्रण स्वीकारतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाने लगेचच पलटवार करत राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का असा सवाल केला. निवृत्त न्यायाधीश मदन बी लोकूर, भारतीय कायदा आयोगाचे माजी अध्यक्ष अजित पी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी लिहिलेल्या पत्राला राहुल गांधींनी उत्तर दिले होते.

PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल

या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी दोन्ही नेत्यांना निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी एका व्यासपीठावर आमंत्रित केले होते. त्यांनी देशाच्या नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, चर्चेचा प्रस्ताव हा पक्षविरहित आणि प्रत्येक नागरिकाच्या व्यापक हिताचा आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी काय म्हणाले?

"लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी देशासमोर त्यांचे व्हिजन एका व्यासपीठावर मांडणे हा एक सकारात्मक उपक्रम असेल," असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 'देशाला आशा आहे की पंतप्रधान मोदी चर्चेत सहभागी होतील. मी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी निमंत्रणावर चर्चा केली आणि त्यांनी सहमती दर्शवली की अशा चर्चेत लोकांना आमचा दृष्टिकोन समजण्यास मदत होईल आणि पर्यायी मार्ग काढता येईल, असंही राहुल गांधी म्हणाले.

या आमंत्रणाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "आपल्या पक्षांवर लावले जाणारे कोणतेही बिनबुडाचे आरोप थांबवणे देखील महत्त्वाचे आहे. निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष म्हणून, जनतेने त्यांच्या नेत्यांचे थेट ऐकणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मी, किंवा काँग्रेस अध्यक्षांना अशा चर्चेत सहभागी होण्यास आनंद होईल."

अर्थपूर्ण आणि ऐतिहासिक चर्चेत सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही गांधी म्हणाले. पंतप्रधान सहभागी होण्यास सहमत आहेत का, त्यानंतर आम्ही चर्चेचे तपशील आणि स्वरूप यावर चर्चा करू, असंही राहुल गांधी म्हणाले.

भाजपचा पलटवार

तेजस्वी सूर्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या पत्रावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त  केली. 'ते काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, इंडिया आघाडीचा विषय सोडा. राहुल गांधी कोण आहेत ज्यांच्याशी पीएम मोदींनी वाद -विवाद करावा? राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, आधी त्यांना काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला लावा. त्यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांना चर्चेसाठी निमंत्रण द्या, असे सांगावे. तोपर्यंत आम्ही आमच्या बीजेवायएमचे प्रवक्ते त्यांना कोणत्याही चर्चेत पाठवण्यास तयार आहोत, असंही तेजस्वी सूर्या म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४