शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर भाजपनं स्वतःला मित्रपक्षांपासून दूर केलं? NDAच्या बैठकीत या दोन पक्षांना नाही बोलावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:51 IST

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात भाजपचे चार मुख्य सहकारी पक्ष आहेत. या निवडणुकीत दोन सहकारी पक्षांचा त्यांच्या जागांवर पराभव झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर, आता बुधवारी दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपने सर्व मित्रपक्षांना बोलावले आहे. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजपने आपल्या दोन मित्रपक्षांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. त्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.

उत्तर प्रदेशात भाजपचे चार मुख्य सहकारी पक्ष आहेत. या निवडणुकीत दोन सहकारी पक्षांचा त्यांच्या जागांवर पराभव झाला आहे. यातील, घोसी लोकसभा मतदारसंघात सुभासपाचे अरविंद राजभर यांना पराभवाचा सामना करावा लागला. ही जागा युती करून भाजपने सुभासपाला दिली होती. तर युतीतील निषाद पार्टीला भाजपने एकही जागा दिली नव्हती. मात्र, या पक्षाच्या प्रवीण निषाद यांना भाजपने संत कबीरनगरमधून उमेदवारी दिली होती.

स्वतःला मित्रपक्षांपासून दूर केलं -मात्र प्रवीण निषाद यांचाही यावेळी पराभव झाला. ते या पूर्वी याच जागेवरून निवडून आले होते. यातच, सुभासपा आणि निषाद पार्टीकडे एकही खासदार नसल्याने त्यांना एनडीएच्या बैठकीत बोलावण्यात आले नसल्याचे समजते. माध्यमांनी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या महातीनुसार, बुधवारी होणाऱ्या बैठकीसाठी भाजपकडून संजय निषाद आणि ओम प्रकाश राजभर यांना अद्याप एनजीएच्या बैठकीसाठी बोलावण्यात आलेले नाही.

या शिवाय, या निवडणुकीत आरएलडीकडून जयंत चौधरी आणि अपना दल एसच्या अनुप्रिया पटेल यांना बैठकीत बोलावण्यात आले आहे. या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे त्यांना दिल्लीत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी