शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; महाराष्ट्र-गुजरातमधील उमेदवारांची होणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 18:51 IST

गुजरात-महाराष्ट्र आणि तेलंगणामधील उमेदवारांच्या निवडीसाठी गेल्या तीन दिवसांपासून भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक सुरू आहे.

Lok Sabha Election 2024:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. पहिली यादी जाहीर केल्यानंतर, भाजपने आता दुसऱ्या यादीची तयारी सुरू केली आहे. सोमवारी(दि.11) सायंकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणातील उर्वरित लोकसभा जागांबाबत चर्चा होईल. त्यानंतर लगेच पक्षाची दुसरी यादी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक गुजरात-महाराष्ट्र आणि तेलंगणामधील लोकसभा उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या कोअर ग्रुपची गेल्या तीन दिवसांपासून बैठक सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीतील भाजप मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपचे प्रमुख सी.आर. पाटील, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह तेलंगणातील भाजप नेत्यांचा समावेश होता.

आंध्र प्रदेशात टीडीपीसोबत निवडणूक लढवणारदक्षिण काबीज करण्यासाठी भाजपने आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि पवन कल्याणच्या जनसेनेशी युती केरुन जागावाटपही पक्के केले आहे. भाजप आंध्रमध्ये लोकसभेच्या 8 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर उर्वरित जागा टीडीपी लढवेल.

195 उमेदवार जाहीरयापूर्वी 2 मार्च रोजी भाजपने 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 34 मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 8, जम्मू-काश्मीरच्या 5, उत्तराखंडच्या 3, अरुणाचलच्या 2, गोव्याच्या 1, त्रिपुराच्या 1, अंदमानच्या 1, दमण आणि दीवच्या 1 जागेचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 28 महिला, 27 एसटी, 18 एसटी, 57 ओबीसी आणि 47 युवा नेत्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४