शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

आणखी ४ टक्के मतं आणि जुळणार ‘४०० पार’चं गणित, लक्ष्य गाठण्यासाठी मोदींचा असा आहे प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 09:00 IST

Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विरोधी पक्षांकडून या लक्ष्याची पोकळ वल्गना म्हणून खिल्ली उडवत आहेत. तर काही जण याला भाजपाचा अतिआत्मविश्वास म्हणत आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विरोधी पक्षांकडून या लक्ष्याची पोकळ वल्गना म्हणून खिल्ली उडवत आहेत. तर काही जण याला भाजपाचा अतिआत्मविश्वास म्हणत आहेत. मात्र समोर येत असलेल्या काही खास आकडेवारीकडे पाहिल्यास नरेंद्र मोदींनी दिलेलं ४०० पारचं लक्ष्य हे कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं दिसत आहे. तसेच भाजपा आणि एनडीए हे लक्ष्य गाठू शकतात, असं दिसून येत आहे. मात्र या मार्गामध्ये अनेक अडथळेही आहेत. 

मोदीच्या अबकी बार ४०० पारवर विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्नही रास्त आहेत. एकीकडे इंडिया आघाडीमध्ये सुमारे २४ पक्ष समाविष्ट आहेत. तर दुसरीकडे एनडीएमध्ये एकट्या भाजपाने मागच्या वेळी ३०३ जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी हे भाजपाच्या ३०३ जागांना ३७० जागांपर्यंत आणि एनडीएला ४०० जागांपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  ४० वर्षांपूर्वी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वबळावर ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. आता मोदींनी भाजपा आणि एनडीएसमोर ४०० हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सद्यस्थितीत भाजपा आणि एनडीएला हे लक्ष्य गाठण्यासाठी ४ टक्के अधिक मतांची गरज आहे. ही अतिरिक्त मतं मिळवल्यास भाजपाचं ४०० पारचं लक्ष्य पूर्ण होऊ शकतं. 

१९८४ मध्ये काँग्रेसने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या, तेव्हा कांग्रेसला ४९.१ टक्के मतं मिळाली होती. तर २०१९ मध्ये भाजपाने विजय मिळवला तेव्हा एनडीएला ४४.४८ टक्के मतं मिळाली होती. त्यात एकट्या भाजपाला ३७.३६ टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच काँग्रेसला १९८४ मध्ये मिळालेल्या मतांपर्यंत पोहोचण्यासाठी एनडीएला ४.२६ टक्के मतांची आवश्यकता आहे. असं झाल्यास एनडीएला ४०० पार मजल मारता येईल. 

मात्र हे तितकंस सोपं नाही याची मोदी आणि भाजपाला जाणीव आहे. हे शक्य होण्यासाठी देशभरात सरकारबाबत सकारात्मक वातावरण असणं आवश्यक आहे. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. त्यात काँग्रेस ४०० पार पोहोचली होती. यावेळी राम मंदिरामुळे आपल्या बाजूने वातावरण निर्माण होईल, अशी भाजपाला आशा आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभा