शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

रमजानच्या महिन्यात मतदान सकाळी सात ऐवजी पहाटे पाच वाजता सुरु करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 6:13 PM

मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम समाजात उपवास ठेवण्याची प्रथा आहे. याशिवाय, मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा असणार आहे. राजस्थान आणि इतर राज्यातील अतिउष्मा असणाऱ्या ठिकाणीही मतदान प्रक्रिया लवकर सुरू करावी अशी मागणी मुस्लीम समाजातून होत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळातच मुस्लीम समाजाचा रमजानचा महिना सुरू होत आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लीम समाजातील व्यक्तींना उपवास असतात. उपवास असताना उन्हात घरा बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे, उरलेल्या तीन टप्प्यांमधील मतदान सकाळी सात ऐवजी पहाटे पाच वाजल्यापासून सुरु करावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.

मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम समाजात उपवास ठेवण्याची प्रथा आहे. याशिवाय, मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा असणार आहे. राजस्थान आणि इतर राज्यातील अतिउष्मा असणाऱ्या ठिकाणीही मतदान प्रक्रिया लवकर सुरू करावी अशी मागणी मुस्लीम समाजातून होत आहे. याविषयी, मुस्लीम समाजाच्य वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये एकूण १६९ जागांसाठी मतदान होणार आहे. उन्हाचा पारा लक्षात घेत दुपारच्या वेळी घर बाहेर पडणे शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे, मतदानाच्या वेळात बदल करावा अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने केली जात आहे.

यासंदर्भातही निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. आता या याचिकांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकMuslimमुस्लीमSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRamadanरमजान