शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

...तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत; सुब्रमण्यम स्वामींची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 09:53 IST

भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणुकीसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे.

नवी दिल्लीः भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणुकीसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे. भाजपानं लोकसभा निवडणुकीत 220-230 जागा जिंकल्यास मोदी कदाचित पंतप्रधान होणार नाहीत, असं सूचक विधान सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचं भाजपाचं नेतृत्वही बदलेल, असा दावाही स्वामींनी केला आहे.ते म्हणाले, भाजपाला स्वबळावर बहुमत गाठता न आल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत, त्यांच्याऐवजी नितीन गडकरी हे चांगला पर्याय ठरू शकतात. परंतु हे सर्व लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल, हे सांगण्यासही स्वामी विसरले नाहीत. 'हफपोस्ट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत स्वामींनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलं आहे.

भाजपाला 230 किंवा त्याहून कमी जागा मिळाल्यास नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. समजा भाजपानं 220 किंवा 230 जागा जिंकल्या, आणि एनडीएच्या मित्र पक्षांना 30 जागा मिळाल्या, तर तो आकडा 250पर्यंत जाईल. पण तरीही बहुमतासाठी 30 जागांची गरज लागणार आहे. अशा परिस्थितीत मोदी पंतप्रधान राहणार की नाही, हे एनडीएतील इतर मित्र पक्ष ठरवणार आहेत. आम्हाला 30 किंवा 40 जागांचा पाठिंबा देणाऱ्या पक्षानं जर मोदींना पंतप्रधान करण्यास विरोध केला, तर आम्ही त्यांना पंतप्रधान करणार नाही, असंही स्वामी म्हणाले आहेत.
मोदींच्या जागी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. असे झाल्यास मला फारच आनंद होईल. कारण गडकरीही मोदींसारखीच चांगली व्यक्ती आहे. तसेच गडकरी हे पंतप्रधानपदासाठी पात्र आहेत. मायावती एनडीएत येतील का, या प्रश्नालाही स्वामींनी उत्तर दिलं. मायावतींनी अजून त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये बसपा हा पक्ष भाजपाच्या विरोधात लढतोय. अशातच मायावती कशा सोबत येतील. मायावतींनी ठरवल्यास बसपा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो. माझा यावर काहीच आक्षेप नाही. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी