Lok Sabha Election 2019 Results: BJP leading on 327 seats, Congress leading on 108 seats | Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट;  सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए तीनशेपार 
Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट;  सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए तीनशेपार 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे कल आता स्पष्ट होऊ लागले असून, सुरुवातीच्या कलांनंतर पुन्हा देशभरात मोदीलाट दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने 277 जागांवर आघाडी घेतली असून, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए 327 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए 108 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 102 जागांवर आघाडीवर आहेत. 

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपा आणि मित्रपक्षांनी आघाडी घेतली. मतमोजणीला सुरुवात होऊन अडीच तास होईस्तोवर भाजपा आणि मित्रपक्षांची आघाडी 300 हून अधिक जागांपर्यंत पोहोचली आहे. 

दरम्यान, काँग्रेस आणि मित्रपक्षांची कामगिरी सुधारली आहे. मात्र एनडीएच्या तुलनेत यूपीएच्या जागा फार कमी आहेत. त्यातही 2014 नंतर पुन्हा एकदा काँग्रेसला तीन आकडी जागा मिळवण्यात अपयश आले आहे. 


Web Title: Lok Sabha Election 2019 Results: BJP leading on 327 seats, Congress leading on 108 seats
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.