शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट सुसाट; भाजपाची स्वबळावर तीनशेपार मजल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 17:12 IST

सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली - सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेले कल आणि काही निकालांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 340 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपानेही स्वबळावर 300 पार मजल मारण्याच्या दिशेने कूच केली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची पुन्हा एकदा दाणादाण उडाली असून, काँग्रेस आणि मित्रपक्ष 90 हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्ष 110 जागांवर आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपा आणि मित्रपक्षांनी आघाडी घेतली होती. मतमोजणीला सुरुवात होऊन  नऊ तास उलटले असून, भाजपा आणि मित्रपक्षांची आघाडी 340 हून अधिक जागांपर्यंत पोहोचली आहे. दक्षिण भारत वगळता देशातील सर्वच भागातून भाजपा आणि मित्रपक्षांना जोरदार समर्थन मिळाले आहे. महाआघाडीने कडवे आव्हान उभे केलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने आपले वर्चस्व राखले असून, उत्तर प्रदेशात 58 हून अधिक जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. बिहारमध्येही भाजपा आणि मित्रपक्ष 36 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 41 जागांवर शिवसेना भाजपा युती आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. येथील 42 मदारसंघांपैकी 18 जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर कर्नाटकमध्ये 28 पैकी 24 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपाने पैकीच्या पैकी जागांवर यश मिळले आहे.  तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, आसाम या राज्यांमध्येही भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. त्याशिवाय तेलंगाणामध्येही ठळक उपस्थिती दर्शवताना भाजपाने पाच जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेस आणि मित्रपक्षांची कामगिरी 2014 च्या तुलनेत सुधारली आहे. मात्र असे असले तरी यूपीएला 100 जागांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. 2014 नंतर काँग्रेसला  पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतपत जागा मिळवण्यामध्येही काँग्रेसचा अपयश येण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Lok Sabha Bypoll Results 2018लोकसभा पोटनिवडणूक निकाल 2018BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी