शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : आईच्या आशीर्वादानंतर पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 10:44 IST

देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यापूर्वी नरेंद्र मोदी गांधीनगर येथील निवासस्थानी गेले. निवासस्थानी त्यांनी आई हिराबेन यांची भेट घेतली. मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. 

नवी दिल्ली - लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान होत आहे. देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यापूर्वी नरेंद्र मोदी गांधीनगर येथील निवासस्थानी गेले. निवासस्थानी त्यांनी आई हिराबेन यांची भेट घेतली. मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. 

पंतप्रधान मोदी यांच्या आई  हिराबेन मोदी यांनी मोदी यांच्या कपाळावर टिळा लावून त्यांचे स्वागत करत त्यांचे तोंड गोड केले. या वेळी त्यांनी मोदी यांना एक नारळ, 500 रुपये आणि मिश्री (मिठाई) भेट दिली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही मोदींनी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी आईचे आशीर्वाद घेतले होते. गुजरात राज्यामध्ये 26 जागांसाठी मतदान होत आहे. काही वेळ आईसोबत गप्पा मारल्यानंतर मोदी मतदान केंद्राच्या दिशेने रवाना झाले.

Lok Sabha Election 2019 : व्होटर ID हे दहशतवाद्यांच्या IED पेक्षा जास्त शक्तिशाली - नरेंद्र मोदी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (23 एप्रिल) सकाळी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'आज देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकशाहीतील या पवित्र पर्वात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. कुंभमेळ्यात गंगास्नान केल्यावर पवित्रतेचा अनुभव येतो. तसेच लोकशाहीत मतदान करुन पवित्रतेचा अनुभव येतो. देशातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी उत्साहाने या मतदान प्रकियेत सहभागी व्हावे. भारतीय मतदार हा समजूतदार आहे. त्याला खरे आणि खोटे समजते' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे शतक पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचं आहे. आपला देश लोकशाहीच्या श्रेष्ठत्वाचं उदाहरण जगाला देतो, असं सांगत मोठ्या संख्येनं नवमतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. एकीकडे दहशतवादाचे शस्त्र आयईडी असते, तर लोकशाहीतील शस्त्र व्होटर आयडी असते, व्होटर आयडी हे आयईडीपेक्षाही जास्त शक्तिशाली आहे. आपण या व्होटर आयडीचे महत्त्व समजून घ्यावे आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे मोदींनी म्हटले आहे.भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. भाजपाची फाइट बऱ्याच ठिकाणी काँग्रेसप्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माकप, तसेच प्रादेशिक पक्षांशी असेल.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा