शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Lok Sabha Election 2019: तृणमूल काँग्रेसकडून पाच बंगाली तारेतारकांना लोकसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:29 AM

निवडणूक झाली वलयांकित; दोन जण राजकारणात नवखे

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी मिमी चक्रवर्ती, मुनमून सेन आदी पाच चित्रपट तारेतारकांना लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली असून त्यातील दोघे तर राजकारणात अगदीच नवखे आहेत.२०१४च्या लोकसभा निवडणुकांतही तृणमूल काँग्रेसने रिंगणात उतरविलेले पाचही चित्रपट कलाकार विजयी झाले होते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी २००९ सालापासून तारेतारकांना उमेदवारी देण्यास सुरूवात केली. दाक्षिणात्य राज्यांमध्ये कलाकारांनी राजकारणाचा आखाडा गाजविणे ही काही नवलाईची गोष्ट नाही पण तेच लोण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आणले. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने २००९च्या निवडणुकीत १९ व २०१४च्या निवडणुकांत ३४ जागा जिंकल्या होत्या. राज्यात तृणमूल काँग्रेसच्या होणाऱ्या प्रचारसभांमध्ये अनेक नामवंत कलाकार हजेरी लावतात. ममतांचे विचार ऐकण्यासाठी व त्या कलाकारांना पाहण्यासाठीही एकच गर्दी उसळते.तृणमूल काँग्रेसतर्फे जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या मिमी चक्रवर्ती या लोकप्रिय नायिका असल्या मात्र राजकारणात अगदी नवख्या आहेत. त्यांची उमेदवारी अनेकांना सुखद धक्का देऊन गेली. आणखी एक बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बसिरहाट या लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आहेत. या दोघांबरोबरच सध्या खासदार असलेले व लोकप्रिय कलाकार दीपक अधिकारी, शताब्दी रॉय, मुनमून सेन हे तिघेही पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुक लढविणार आहेत.‘या' दोघांचे तिकीट कापलेकलाकारांना उमेदवारी देताना तृणमूल काँग्रेसने विद्यमान खासदार तापस पाल, संध्या रॉय यांना पुन्हा तिकीट दिलेले नाही. रोझ व्हॅली चीट फंड घोटाळाप्रकरणी तापस पाल यांना सीबीआयने २०१६ साली अटक केली होती व त्यांची नंतर जामिनावर मुक्तता झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जी