भाजपकडून आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर ; कॉंग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 03:28 PM2019-05-22T15:28:48+5:302019-05-22T15:40:43+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले असताना, मध्ये प्रदेशमधील कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजप कडून हालचाली सुरु असल्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे पहायला मिळत आहे.

lok sabha election 2019 BJP offers Congress mla | भाजपकडून आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर ; कॉंग्रेसचा दावा

भाजपकडून आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर ; कॉंग्रेसचा दावा

Next

भोपाळ - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना, कॉंग्रसने भाजप वर केलेल्या गंभीर आरोपावरून खळबळ उडाली आहे. मध्ये प्रदेशमधील कॉंग्रेसच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. मात्र आमचे आमदार विकले जाणार नाही असा दावा सुद्धा यावेळी कमलनाथ यांनी केला. भाजपने मात्र कमलनाथ यांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले असताना, मध्ये प्रदेशमधील कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजपकडून हालचाली सुरु असल्याच्या  आरोपामुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे पहायला मिळत आहे. कॉंग्रेसच्या १० आमदारांना आतापर्यंत भाजपकडून ऑफर देण्यात आली असल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.

कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी  ५० कोटीची ऑफर देण्यात येत आहे. असा, गंभीर आरोप मध्यप्रदेशमधील कॉंग्रेस सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले प्रद्युम सिंह तोमर यांनी केला आहे. तर, काही आमदारांना भाजपकडून महत्वाची पदे देण्याची आश्वासने दाखवण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा तोमर यांनी केला आहे.

मध्ये प्रदेशात 2018 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शिवराज सरकारला पराभूत करून सत्तास्थापन केली होती. 230 सदस्य असलेल्या या विधानसभेत काँग्रेसला 114 जागा, भाजपला 109, बहुजन समाज पार्टीला 2, समाजवादी पक्षाने 4 जागा जिंकल्या होत्या. बसपा आणि इतर अपक्ष आमदारांच्या मदतीने कमलनाथ यांनी मध्ये प्रदेशात कॉंग्रेसची सत्ता स्थापन केली होती.

 

 

Web Title: lok sabha election 2019 BJP offers Congress mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.