भाजपसाठी आयुष्य समर्पित करणारे नेतेच जाहीरनाम्यातून हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 04:33 PM2019-04-10T16:33:47+5:302019-04-10T16:38:49+5:30

ग्रामोद्योग आयोगाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनदर्शिकावर महात्मा गांधी यांचा चरका चालवतांनाच्या फोटोच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावण्यावरून मोदींवर मोठी टीका झाली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा चर्चेत आले ते भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामुळे.

lok sabha election 2019 BJP leader missing from the manifesto | भाजपसाठी आयुष्य समर्पित करणारे नेतेच जाहीरनाम्यातून हद्दपार

भाजपसाठी आयुष्य समर्पित करणारे नेतेच जाहीरनाम्यातून हद्दपार

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सगळेच पक्ष स्वत:चा जाहीरनामा मतदारांना आकर्षित वाटले पाहिजे यांची काळजी घेऊन जाहीरनामा बनवत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा जाहीरनामा मात्र चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. भाजपच्या जाहिरनामाच्या मुखपृष्टावर केवळ नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला आहे. यामुळे भाजपसाठी आपलं आयुष्ट समर्पित कऱणाऱ्या नेत्यांनाच जाहिरनाम्याच्या मुखपृष्टावरून वगळल्याची चर्चा सुरू आहे. वस्तविक पाहता, २०१४ च्या जाहीरनाम्यात भाजपच्या सर्व नेत्यांचा फोटो दिसून येत होता. 

याआधी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनदर्शिकावर महात्मा गांधी यांचा चरका चालवतांनाच्या फोटोच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावण्यावरून मोदींवर मोठी टीका झाली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा चर्चेत आले ते भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामुळे.

भाजप हा घराणेशाही किंवा एकट्या दुकट्याचा पक्ष नसल्याचे मोदी नेहमी म्हणतात. मात्र २०१९ निवडणुकीत नरेंद्र मोदींना भाजपच्या नेत्याचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०१४ मधील निवडणुकीत भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात पक्षाच्या जेष्ठ नेत्याचे फोटो होते. भाजपला उभा करण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या नेत्यांना मात्र २०१९ मधील जाहीरनाम्यातून डावलले गेले असल्याची चर्चा आता भाजपच्या गटात सुरु आहे.  

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात फक्त नरेंद्र मोदींचे फोटो पहिल्या पानावर छापण्यात आले आहे. २०१४ मध्ये भाजपने तयार केलेल्या जाहीरनाम्याच्या पहिल्या पानावर मोदींसहित अकरा जणांचे फोटो छापण्यात आले होते. पक्षाच्या उभारणीला संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या नेत्यांना डावलले गेल्याने भाजपच्या गटात मोदीं बद्दल आता उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहे.

Web Title: lok sabha election 2019 BJP leader missing from the manifesto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.