Lok Sabha 2019 Exit Poll: उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी भाजपासाठी ठरणार जायंट किलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 19:32 IST2019-05-19T19:31:34+5:302019-05-19T19:32:07+5:30
मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे.

Lok Sabha 2019 Exit Poll: उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी भाजपासाठी ठरणार जायंट किलर
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांकडून निकालांचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एबीपी न्यूज आणि नेल्सनने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला केवळ 22 जागा मिळतील असा अंदाज आहे तर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी आघाडीला 56 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीत 73 जागा जिंकणाऱ्या भाजपाला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय.
23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागतील. मात्र त्याआधी वर्तविण्यात आलेल्या या अंदाजामुळे भाजपासाठी उत्तर प्रदेशातील निकाल डोकेदुखी ठरतील असचं दिसतंय. लोकसभेच्या 542 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. निवडणूक निकालानंतर देशात कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट होईल.
उत्तर प्रदेश (2019)
एनडीए - 22
सपा-बसपा - 56
काँग्रेस - 02
उत्तर प्रदेश (2014)
एनडीए - 73
युपीए- 02
सपा- बसपा- 04
इतर - 01
तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये 64 जागांचा फटका भाजपाला बसणार तर 35 जागांचा फायदा युपीएला होणार असल्याचं सांगण्यात आलंय.