LockdownNews : "काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही", योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:49 PM2020-05-20T14:49:43+5:302020-05-20T14:59:16+5:30

परिवहन मंत्री अशोक कटारिया म्हणाले, आमच्याकडे पुरेशा बसेस आहेत. आम्ही सातत्याने लाखो लोकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवत आहोत. काँग्रेस केवळ राजकारण करत आहे.

Lockdown Latest Marathi news Bus controversy between yogi government and congress in up sna | LockdownNews : "काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही", योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली

LockdownNews : "काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही", योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस खासगी बसेस ऐवजी राजस्थान रोडवेजच्या बसेस पाठवत आहे, परिवहनमंत्री अशोक कटारिया यांचा आरोपकटारिया म्हणाले, आम्ही सातत्याने लाखो लोकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवत आहोत.आम्ही एखाद्या सरकारच्या बसेस पक्षाकडून घेऊ शकत नाहीत - कटारिया

लखनौ : मजुरांसाठी बसेसच्या मुद्यावरू उत्तर प्रदेश सरकार आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. आता, योगी सरकारचे परिवहन मंत्री अशोक कटारिया यांनी आरोप केला आहे, की काँग्रेस खासगी बसेस ऐवजी राजस्थान रोडवेजच्या बसेस पाठवत आहे. ज्या आम्ही कुण्या पक्षाकडू घेऊ शकत नाही. जर आम्हाला राजस्थान रोडवेजच्या बसेसची आवश्यकता असेल तर सरकार दोन्ही राज्यांची सरकारे आपसात चर्चा करून घेतील.

परिवहन मंत्री अशोक कटारिया म्हणाले, आमच्याकडे पुरेशा बसेस आहेत. आम्ही सातत्याने लाखो लोकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवत आहोत. काँग्रेस केवळ राजकारण करत आहे. ज्या 879 बसेसे ठीक आहे, असे सांगितले जात आहे. त्या सर्व राजस्थान सरकारच्या बसेस आहेत. काँग्रेसला एवढीच चिंता आहे, तर ते मजुरांना थेट राजस्थानातूनच उत्तर प्रदेशात का आणत नाही.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

परिवहन मंत्री म्हणाले, मजुरांना बॉर्डरवरच का सोडले जात आहे? आम्ही एखाद्या सरकारच्या बसेस पक्षाकडून घेऊ शकत नाहीत. सरकारच्या बसेस सरकारकडूनच घेतल्या जाऊ शकतात. आमचे चीफ सेक्रेटरी त्यांच्या चीफ सेकेटरींशी बोलून हे करू शकतात. काँग्रेस एवढीच उतावीळ आहे, तर त्यांनी कोटातून मुलांना काढताना बसेस का उपलब्ध करून दिल्या नाही.

आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

काँग्रेस नेते राजीव शुक्ला जवळपास 800 बसेससह दिल्ली-नोएडा बॉर्डरवर -

यादरम्यान, दिल्ली-नोएडा बॉर्डरवर बुधवारी दुपारी काँग्रेस नेते राजीव शुक्ला जवळपास 800 बसेससह बॉर्डर ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तेथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या नोएडा पोलिसांनी या बसेस आडवल्या आणि बसेसला तेथूनच यू टर्न घ्यावा लागला. राजीव शुक्ला म्हणाले, सरकारने स्पष्टपणे पाहावे, की या स्कूटर, रिक्ष आहेत, की बसेस?

चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती

बसेसच्या यादीत तीनचाकी, दुचाकी आणि कारचे नंबर -

तत्पूर्वी मंगळवारी, स्थलांतरित मजुरांच्या व्यवस्थेसाठी काँग्रेसने राज्य सरकारकडे दिलेल्या बसेसच्या यादीत अनेक नंबर तीनचाकी, दुचाकी आणि कारचे आहेत, असा खळबळ जनक दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी केला आहे. एवढेच नाही, तर मृत्युंजय कुमार यांनी ही यादीही जाहीर केली आहे. 

CoronaVirus News: चिंता वाढली! सध्या कोरोनावरील व्हॅक्सीन तयार होऊ शकणार नाही, WHOचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले...

Web Title: Lockdown Latest Marathi news Bus controversy between yogi government and congress in up sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.