शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांना इंगा दाखवणाऱ्या रियाचा SSP यांनी केला गौरव; पाहा जेव्हा तरूणी बनते 'सिंघम' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 20:20 IST

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक विद्यार्थिनी चोरी करून पळून जाणाऱ्या बदमाशांना भिडली.

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक विद्यार्थिनी चोरी करून पळून जाणाऱ्या बदमाशांना भिडली. खरं तर या धाडसी विद्यार्थीनीने चोरट्याची कॉलर पकडून त्यांना दुचाकीवरून खाली पाडले. मात्र, यानंतर चोरटे कानातले ओढून घेऊन पळून गेले. यादरम्यान वृद्ध महिला आणि तिची नात या दोघींनीही मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र कोणीही पुढे आले नाही. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. घटनेच्या सुमारे सहा तासांनंतर पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना चकमकीत अटक केली. अशातच आता मेरठच्या एसएसपी यांनी काल आज्जीकडून सोन्याची साखळी चोरणाऱ्या बदमाशांशी लढणाऱ्या रियाचा गौरव केला आहे. एसएसपींच्या हस्ते सन्मान मिळाल्यानंतर रियाने आनंद व्यक्त केला. रिया म्हणते की, तिला पोलिसांत जाऊन लोकांची सेवा करायची आहे. ती लोकांना सांगते की, अशी घटना घडल्यास घाबरू नये, तर धैर्याने लढा दिला पाहिजे.

दरम्यान, ही घटना मेरठमधील लालकुर्ती भागातील आहे. शनिवारी सायंकाळी 80 वर्षीय वृद्ध महिला संतोष आपली नात रियासोबत बाजारात जात होती. याच दरम्यान बाईकस्वारांनी आजीबाईंचे सोन्याचे कानातले ओरबाडले नि चोरून पोबारा केला. अशातच रिया हिने चपळाई दाखवत कॉलर पकडून चोरट्याला दुचाकीवरून खाली ओढले. संतोष आणि रिया यांनी आरडाओरडा करत लोकांकडे मदत मागितली, पण कोणीच आले नाही. यानंतर चोरटे दुचाकीवरून पळून गेले. 

जेव्हा तरूणी बनते 'सिंघम' दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. यानंतर, खबरदाराच्या माहितीवरून पोलिसांनी सुमारे सहा तासांनंतर रात्री उशिरा दोन्ही चोरट्यांना अटक केली.  

पोलिसांनी चोरट्यांना केली अटक या घटनेच्या संदर्भात, मेरठचे एसपी सिटी पीयूष सिंग यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी ५ वाजता लाल कुर्ती पोलीस स्टेशन परिसरातील मैदा परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन बदमाशांनी हे कृत्य केले. याचा व्हिडीओ मिळाला आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत स्टेशन प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशtheftचोरीPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी