Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:39 IST2025-05-15T16:34:45+5:302025-05-15T16:39:32+5:30

Lizard In Ice Cream Cone : तुमच्या आवडीच्या आईस्क्रीममध्ये पाल दिसली तर? वाचूनच किळस आला ना... परंतु, अशीच एक घटना अहमदाबादच्या मणिनगरमध्ये एका महिलेसोबत घडली आहे.

Lizard Tail Found in Cone Ice Cream Woman Hospitalized with Severe Stomach Pain | Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल

Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल

Lizard In Ice Cream Cone : आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच खूप आवडतं, ज्याला आवडत नाही, असा व्यक्ती निराळाच. पण, याच तुमच्या आवडीच्या आईस्क्रीममध्ये पाल दिसली तर? वाचूनच किळस आला ना... परंतु, अशीच एक घटना अहमदाबादच्या मणिनगरमध्ये एका महिलेसोबत घडली आहे. या घटनेनंतर महिलेची तब्येत बिघडली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या महिलेच्या नवऱ्याने मणिनगर रेल्वे क्रॉसिंगजवळील एका दुकानातून हॅवमोर कंपनीचा आईस्क्रीम कोन आणला होता. जेव्हा त्या महिलेने आईस्क्रीम खाण्यास सुरुवात केली तेव्हा, तिला काहीतरी विचित्र वाटले, तिच्या दाताखाली एखादी बुळबुळीत गोष्ट आल्यासारखी वाटली. तिने निरखून पाहिले तेव्हा लक्षात आले की,ती पालीची शेपटी होती. या भयानक घटनेनंतर महिलेला उलट्या झाल्या आणि तिची तब्येत बिघडली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. तक्रारीनंतर अन्न विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दुकान सील करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच, अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) अन्न विभागाने कारवाई केली. सर्वप्रथम, त्यांनी मणिनगरमधील महालक्ष्मी कॉर्नर दुकान सील केले. यानंतर, ज्या कंपनीचे आइस्क्रीम दिले गेले होते त्या कंपनीच्या कारखान्याची म्हणजेच हॅवमोरची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान, तेथून आईस्क्रीमचे नमुनेही घेण्यात आले.

दुकानसह कंपनीवरही कारवाई
महालक्ष्मी कॉर्नर येथे चालणाऱ्या आईस्क्रीम दुकानाकडे आवश्यक परवाना आणि कागदपत्रे नसल्याचे तपासात समोर आले. या कारणास्तव एएमसीने तात्काळ दुकान सील केले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की दुकान मालकाने अन्न विभागाची मान्यता घेतली नव्हती किंवा स्वच्छतेशी संबंधित नियमांचे पालन केले नव्हते.

या प्रकरणात एएमसीने हॅवमोर कंपनीला थेट ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला . महिलेचे आरोग्य धोक्यात आणणे आणि स्वच्छतेचे नियम न पाळल्याबद्दल ही कठोर कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हटले आहे.

Web Title: Lizard Tail Found in Cone Ice Cream Woman Hospitalized with Severe Stomach Pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.