चिंध्या गोळा करणाऱ्या महिलेने राहुल गांधींना सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 06:24 AM2022-11-27T06:24:33+5:302022-11-27T06:25:06+5:30

झोपडीत राहतो, वीज काय पाणीसुद्धा मिळत नाही

Lives in a hut, does not even get electricity or water, rahul gandhi met poor women in MP | चिंध्या गोळा करणाऱ्या महिलेने राहुल गांधींना सांगितली व्यथा

चिंध्या गोळा करणाऱ्या महिलेने राहुल गांधींना सांगितली व्यथा

Next

बरवाह (मध्यप्रदेश) : आम्ही झोपडीत राहतो. वीज आणि पाणीसुद्धा मिळत नाही. माझी मुले शाळेतही जाऊ शकत नाहीत, अशा शब्दांत शन्नू (४५) या महिलेने आपली व्यथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सांगितली. भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी हे सध्या मध्यप्रदेशात आहेत. शन्नू आणि तिचे कुटुंबीय रस्त्याच्या कडेला गर्दीत उभे होते. 

खरगाेन जिल्ह्यात यश परमार नावाच्या १० वर्षांच्या मुलाने राहुल गांधी यांना पैशांची गुल्लक भेट दिली. यात्रेदरम्यान त्यांना पैशांची गरज पडेल म्हणून त्याने पाॅकेटमनीतून वाचवून हे पैसे जमा केले हाेते. त्याची ही प्रेमळ भेट राहुल यांनी स्वीकारले आणि यशचे भरपूर काैतूकही केले.

Web Title: Lives in a hut, does not even get electricity or water, rahul gandhi met poor women in MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.