शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

भागवतांच्या भाषणाचे थेट प्रसारण वादात

By admin | Updated: October 4, 2014 02:55 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपूर येथील भाषणाचे दूरदर्शनवर थेट प्रसारण झाल्यामुळे वाद उफाळला असून, विरोधी पक्ष सरकारवर कडाडून टीका करीत आहेत.

नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपूर येथील भाषणाचे दूरदर्शनवर थेट प्रसारण झाल्यामुळे वाद उफाळला असून, विरोधी पक्ष सरकारवर कडाडून टीका करीत आहेत. सरकारी वाहिनीचा सत्ताधारी पक्षाकडून गैरवापर केला जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे, तर भाजपा आपल्या कृतीचे समर्थन करीत आहे. 
 भागवत यांच्या तासाभराच्या भाषणाचे प्रसारण ही घातक परंपरा आहे. आरएसएस ही वादग्रस्त संघटना असून, तिच्या प्रमुखाचे भाषण प्रसारित करण्याचा सरकारचा हा निर्णय राजकीय असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ता संदीप दीक्षित यांनी केला. यापुढे देशाचे नियंत्रण नागपूरहून होईल, अशी भीती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केली. फॉर नागपूर, बाय नागपूर आणि ऑफ नागपूर असा अधिकृत मीडिया असेल़ या घटनेने भाजपाचा खरा रिमोट कंट्रोल कोण आहे हे समोर आले, असे सिंघवी म्हणाले. सरकारी यंत्रणोचा गैरवापर करण्याच्या या कृतीस विरोध केला पाहिजे, असे रशिद अल्वी म्हणाले. आरएसएसच्या राष्ट्रीयत्वाचे रेकॉर्ड आमच्या राष्ट्रीय भावनेपेक्षा वरचढ असल्याचे आम्ही मान्य करणार नाही, असे माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद म्हणाले. 
 आरएसएसने या प्रसंगाचा वापर आपले हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान प्रसिद्ध करण्यास केला़ आरएसएससारख्या संघटनेच्या प्रमुखाचे भाषण थेट प्रसारित करण्याचा उद्योग दूरदर्शनने करायला नको होता, असे भाकपाचे सरचिटणीस डी. राजा म्हणाले.  ही परंपरा अस्वस्थ व बेचैन करणारी आह़े यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रतिमेला धक्का बसला आहे, असे त्यांनी सांगितले. 
हा सरकारी यंत्रणोचा गैरवापर असल्याचे जद (सं) प्रवक्ता के.सी. त्यागी म्हणाले, भविष्यात माहिती व प्रसारण मंत्रलयाने अशा घटनांचे प्रसारण न करण्याचे भान बाळगावे असे त्यानी म्हटले आहे. इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. आरएसएस ही हिंदू संघटना आहे, आता मशिदीचे इमाम व चर्चचे बिशपही त्यांची भाषणो थेट प्रसारीत करण्याची मागणी करतील , असे गुहा यांनी आपल्या ट¦ीटमध्ये म्हटले आहे. 
भागवत काय बोलतात हे लोकांना ऐकायचे असते , असे भाजपा प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी 
म्हटले आहे, प्रसार भारती ही 
स्वतंत्र संघटना आहे, कोणती 
बातमी प्रसारीत करायची याचा निर्णय घेण्याचा तिला अधिकार आहे 
असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस व 
डावे पक्ष नसलेल्या मुद्यावर रान उठवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप लेखी यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
आमच्यासाठी ती इतर कोणत्याही बातमीप्रमाणो एक बातमी होती, आम्ही ती प्रसारित केली. त्यासाठी कोणतीही विशेष तयारी करण्यात आली नव्हती. 
-अर्चना दत्त, वृत्तसंचालक, दूरदर्शन
 
खरेतर इतकी वर्षे सरसंघचालकांच्या भाषणाचे थेट प्रसारण दूरदर्शनने का केले नाही, असा प्रश्न विचारायला हवा. दूरदर्शनला काँग्रेस सरकारने जोखडात ठेवले होते म्हणूनच असे झाले होते. आता तसे बंधन नाही. 
-प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री, 
माहिती व प्रसारण
 
त्यांची हुकूमत आहे, त्यांचेच ऐकावे लागणार
सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपुरातील भाषण दूरदर्शनने लाइव्ह टेलीकास्ट केल़े कारण आता त्यांची हुकूमत आह़े आता त्यांचेच ऐकावे लागणार.-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस