...जेव्हा शहरातील रस्त्यावर फिरतात सिंह, कॅमेरात कैद झाला थरकाप उडवणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 10:29 IST2021-07-07T10:23:38+5:302021-07-07T10:29:20+5:30

Shocking Video of lions : रात्रीच्या अंधारात हायवेवर फिरताना दिसले 5 सिंह

lions roaming on streets of city, video went viral on social media | ...जेव्हा शहरातील रस्त्यावर फिरतात सिंह, कॅमेरात कैद झाला थरकाप उडवणारा व्हिडिओ

...जेव्हा शहरातील रस्त्यावर फिरतात सिंह, कॅमेरात कैद झाला थरकाप उडवणारा व्हिडिओ

ठळक मुद्देकैमरात कैद झाला थरकाप उडवणारा व्हिडिओव्हिडिओ गुजरातमधील अमरेलीचा आहेहायवेवर 5 सिंह फिरताना दिसत आहेत

अमरेली : सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील अमरेलीचा आहे. येथील अमरेली-राजुला हायवेवर 5 सिंह फिरताना दिसले. हे थरकाप उडवणारे दृष्य नागरिकांनी आपल्या कॅमेरात कैद केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, जंगली जनावरे शहरातील रस्त्यांवर फिरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा वाघ आणि बिबट्यासह अनेक जंगली प्राणी शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसले आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मादी सिंह आणि तिची पिले मोठ्या तोऱ्यात हायवेवर फिरताना दिसत आहेत. त्या सिंहाना पाहून रस्त्यावरील कुत्रे भूंकत असल्याचा आवाजही येत आहे. रात्रीच्या वेळी हायवेवर गाड्यांचे येणेजाणे कमी असते, त्यामुळे अनेकदा जंगली प्राणी रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात.


5 सिंहाचा हा व्हिडिओ ट्विटरवर @oldmumbai नावाच्या एका पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत, ''हे आफ्रीका नाही, भारत आहे. गुजरातच्या पीपावाव पोर्टमध्ये सिंहाची टोळी रस्त्याने फिरत आहे'', असे कॅप्शन लिहीले आहे.

Web Title: lions roaming on streets of city, video went viral on social media