शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

...तरच नोव्हेंबरपर्यंत मिळेल मोफत धान्य; मोदी सरकारनं घातली महत्त्वाची अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 10:19 IST

पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनेला मुदतवाढ

नवी दिल्ली: कोरोना संकटाची तीव्रता पाहता गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्न धान्य मिळणार असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना तीन महिने मोफत धान्य मिळणार असल्याचं मोदींनी जाहीर केलं होतं. हीच योजना नोव्हेंबरपर्यंत सुरूच राहणार असल्याची घोषणा मोदींनी गेल्या आठवड्यात केली. मात्र आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणाऱ्या व्यक्तींनाच या योजनेचा लाभ होईल.पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सरकार गरिबांना नोव्हेंबरपर्यंत धान्याचा मोफत पुरवठा करणार आहे. मात्र त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक न केलेल्यांसाठी सरकारनं ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सरकारकडून गरिब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू/तांदूळ आणि एक किलो चणे दिले जात आहेत. हे धान्य महिनाभरासाठी पुरवण्यात येत आहे. तीन महिन्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आता नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. त्यासाठी सरकारनं आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली मुदतही वाढवली आहे. जास्तीत जास्त लोकांना पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेता या दृष्टीनं आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. रेशन कार्ड आधारला लिंक कसं कराल?१. रेशन कार्डला आधारसोबत लिंक करण्यासाठी UIDAI चं अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वर जा.२. स्टार्ट नाऊचा पर्याय निवडा.३. तुमचा पूर्ण पत्ता भरा. (जिल्हा आणि राज्याच्या माहितीसह)४. उपलब्ध पर्यायांमधून रेशन कार्डचा पर्याय निवडा.५. यानंतर तुमचा रेशन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, ई-मेल आणि मोबाईल नंबर भरा.६. यानंतर तुमच्या मोबाईलवर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर नोटिफिकेशन येईल.७. तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यावर रेशन कार्डला आधार लिंक होईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीAdhar Cardआधार कार्ड