मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:18 IST2025-06-09T06:17:50+5:302025-06-09T06:18:15+5:30

Health News: अनेक प्रकारचे प्राणघातक कर्करोग आहेत आणि त्याची कारणेही अनेक आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाल्ल्याने किंवा व्यायाम न केल्याने कर्करोग होतो. अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की मानवी शरीर २४ तास सर्केडियन सायकलमध्ये काम करते.

Light from mobiles and laptops can also cause cancer; Doctors say, stop looking at mobiles | मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच

मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच

नवी दिल्ली - अनेक प्रकारचे प्राणघातक कर्करोग आहेत आणि त्याची कारणेही अनेक आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाल्ल्याने किंवा व्यायाम न केल्याने कर्करोग होतो. अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की मानवी शरीर २४ तास सर्केडियन सायकलमध्ये काम करते. ते झोप, हार्मोन्स आणि आवश्यक शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवते. रात्री मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. रात्री उशिरापर्यंत स्क्रीनकडे पाहिल्याने हे चक्र बिघडते. शरीराची प्रणाली असंतुलित होते. यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखणाऱ्या मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती कमी होते. परिणामी शरीराची प्रणाली असंतुलित होते.

स्तन, प्रोस्टेट आणि आतड्याच्या कर्करोगाचा धोका अधिक
रात्री सतत निळ्या प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने स्तन, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने पुरुषांत प्रोस्टेट कर्करोगाचा धोका दुपटीने वाढतो. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका ५०% वाढतो. 
औद्योगिक क्षेत्रात स्तनाच्या कर्करोगाचा धोका पाचपट जास्त असतो, कारण रात्रीच्या वेळी तिथे जास्त प्रकाश वापरला जातो. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना जास्त धोका असतो. 
२०२१ च्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने थायरॉईड कर्करोगाचा धोकादेखील वाढतो. रात्रीच्या वेळी निळ्या प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने तुमची ऊर्जा कमी होते. 
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जगातील प्रत्येक पाच जणांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी कर्करोग होऊ शकतो. 

नेमके काय करायला हवे?
पुरेशी झोप न घेतल्याने आणि कृत्रिम प्रकाशात राहणे यामुळे कर्करोग होऊ शकतो. म्हणून झोपण्यापूर्वी २ तास आधी मोबाइल पाहणे बंद करा. सूर्यास्तानंतर घरातील दिवे मंद ठेवा. वेळी झोपण्याचे आणि जेवण्याचे वेळापत्रक बनवा. मोबाइलमध्ये नाइट मोड चालू करा. बेडरूम शांत, अंधारी, आरामदायी ठेवा. 
- डॉ. अंकित जैन, सहायक प्राध्यापक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, एम्स

Web Title: Light from mobiles and laptops can also cause cancer; Doctors say, stop looking at mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.