"प्रयागराजला चला, कुंभमेळा उधळून लावा, हिंदुत्ववादी विचार संपवा’’, दहशतवादी पन्नूची चिथावणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:53 IST2025-01-06T16:52:26+5:302025-01-06T16:53:47+5:30

Gurpatwant Singh Pannu News: १२ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कुंभेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिथावणीखोर विधान केलं आहे.

"Let's go to Prayagraj, disrupt the Kumbh Mela, end Hindutva ideology", terrorist Pannu's incitement | "प्रयागराजला चला, कुंभमेळा उधळून लावा, हिंदुत्ववादी विचार संपवा’’, दहशतवादी पन्नूची चिथावणी  

"प्रयागराजला चला, कुंभमेळा उधळून लावा, हिंदुत्ववादी विचार संपवा’’, दहशतवादी पन्नूची चिथावणी  

१२ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कुंभेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिथावणीखोर विधान केलं आहे. गुरपतवंत सिंग पन्नू याने प्रयागराज येथील कुंभमेळा उधळून लावण्यासाठी चिथावणी दिली आहे.

कुंभमेळ्याविरोधात चिथावणी देणारा एक व्हिडीओ गुरपतवंत सिंग पन्नू याने शेअर केला आहे. त्यामधून त्याने हिंदुत्ववादी विचारसरणी संपवण्याचं आवाहन केलं आहे. महाकुंभमेळ्यात अडथळा आणण्यासाठी प्रयागराज चलो, असं आवाहन पन्नू त्याच्या व्हिडीओमधून करत आहे.

त्याबरोबरच गुरपतवंत सिंग पन्नू याने या व्हिडीओमधून विमानतळांवर खलिस्तान आणि काश्मीरचे झेंडे फडणवण्याचं आवाहन खलिस्तानी समर्थकांना केलं आहे. मात्र बहुतांश लोक गुरपतवंत सिंग पन्नू याच्याकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या ह्या निव्वळ ड्रामेबाजी असल्याचं मानतात. तसेच तो ज्या शीख समाजाचा आपण प्रतिनिधी असल्याचा दावा करतो. त्या शीख समाजाकडूनही त्याला फारसं समर्थन मिळत नसल्याचं दिसून येत आहे. 

Web Title: "Let's go to Prayagraj, disrupt the Kumbh Mela, end Hindutva ideology", terrorist Pannu's incitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.