शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

देश पुन्हा वेगवान विकास पथावर जावा

By admin | Updated: February 7, 2015 02:36 IST

देशाला पुन्हा वेगवान विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी नव्या कल्पना सुचवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अर्थतज्ज्ञांना केले आहे.

निति आयोगाची पहिली बैठक : जागतिक वातावरणाचा लाभ घ्यावानवी दिल्ली : तेलाच्या किमतीतील घट आणि अनुकूल जागतिक वातावरणाचा लाभ घेत देशाला पुन्हा वेगवान विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी नव्या कल्पना सुचवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अर्थतज्ज्ञांना केले आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या निति आयोगाची शुक्रवारी मोदींच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक झाली.महसूलवाढीला गती देण्यासह खर्चकपातीवर लक्ष देण्याची गरज असून येता अर्थसंकल्प विकासाभिमुख आणि गुंतवणुकीला चालना देणारा असावा यासाठी अर्थतज्ज्ञांनी आपली मते आणि सूचना द्याव्यात, असे ते म्हणाले. जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सध्याच्या जागतिक वातावरणाचा लाभ घेत भारताने वेगवान विकास घडवून आणायलाच हवा, असे मोदींनी स्पष्ट केले. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर भारताला विदेशी विनिमयाची मोठी बचत करण्यास मदत करणारा आहे. या अवस्थेत चिनी अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला असतानाच युरोपियन देशांमध्ये मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे भारताला गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी आली आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क) अर्थतज्ज्ञांसोबत चर्चा...मोदींनी पहिल्यांदाच नवगठित निति आयोगाला भेट दिली. समाजवादाच्या काळापासूनचा योजना आयोग रद्द करून त्या जागी आलेला नवा आयोग ही शक्तिशाली संस्थात्मक यंत्रणा असून सरकारबाहेरील व्यक्तीही त्यात धोरणात्मक योगदान देऊ शकतील, असेही मोदींनी अर्थतज्ज्ञांसोबत चर्चा करताना स्पष्ट केले. गुंतवणूक आणि विकासवाढीला चालना देण्यासह अर्थसंकल्पाबाबत सूचना मागविण्यासाठी काही अर्थतज्ज्ञांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. निति आयोग हा ‘थिंक टँक’ म्हणून काम करणार असून आजची बैठक त्याचाच एक भाग होती.असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.