शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

धडा शिकवणार : पाकिस्तानला जाणारे पाणी भारत अडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 02:03 IST

सिंधू पाणी वाटप करारानुसार आपल्या वाट्याचे पाणी आतापर्यंत भारताकडून वापरण्यात आलेले नाही. तथापि, पाकिस्तानकडून भारतात अतिरेकी पाठविण्याच्या धोरणाचा बदला घेण्यासाठी आता भारताने हे पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

 नवी दिल्ली : सिंधू पाणी वाटप करारानुसार आपल्या वाट्याचे पाणी आतापर्यंत भारताकडून वापरण्यात आलेले नाही. तथापि, पाकिस्तानकडून भारतात अतिरेकी पाठविण्याच्या धोरणाचा बदला घेण्यासाठी आता भारताने हे पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जम्मू-काश्मिरातील कठुआ जिल्ह्यात एक धरण बांधण्याच्या योजनेवर सरकार काम करीत आहे.सिंधू पाणी वाटप करारानुसार भारताच्या वाट्याला येणारे पाणी वापरण्यासाठी उझ बहुउद्देशीय प्रकल्पाच्या अहवालाला केंद्रीय जल आयोगाने अंतिम स्वरूप दिले आहे. हा अहवाल जम्मू-काश्मीर सरकारला सादर करण्यात आला. त्यावर लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उझ ही रावीची उपनदी आहे. कठुआ जिल्ह्यात उझचा प्रवाह अडविण्यात येईल. ०.६५ दशलक्ष एकर फूट (एमएएफ) पाणी साठविण्याची क्षमता त्यातून निर्माण होईल. त्यातून ३० हजार हेक्टर शेतीचे सिंचन होऊ शकेल, तसेच २०० मेगावॅट वीज निर्माण होईल.२०१६ मध्ये पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी उरी येथील लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात वाहून जाणारे भारताच्या वाट्याचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्या नेतृत्वाखाली एक आंतर-मंत्रालयीन समिती स्थापन करण्यात आली होती.१९६० साली सिंधू पाणी वाटप करार झाला होता. या करारानुसार सिंधू खोºयातील रावी नदीचे पाणी भारताच्या वाट्याला आहे. २००१ मध्येच हे पाणी अडविण्याला हिरवा कंदील मिळाला होता. तथापि, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करायला जल आयोगाला १६ वर्षे लागली. विद्यमान सरकारने या कामाला अधिक गती दिली. सिंधू नदीच्या खोºयातील आपल्या हिश्श्याचे जास्तीत जास्त पाणी वापरण्यासाठी सर्व पर्याय वापरण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर कृती दलाची स्थापना केली होती.पाकिस्तान बांधणार झेलम नदीवर धरणइस्लामाबाद: जलविद्युत निर्मितीसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेलम नदीवर एक धरण बांधण्याची योजना पाकिस्तान सरकारने आखली आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय विद्युत नियामक प्राधिकरणाच्या हवाल्याने ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार या ‘आझाद पत्तन जलविद्युत प्रकल्प’ असे याचे नाव असून त्यासाठी १.५१ अब्ज डॉलर कर्च येईल व तो सन २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पखर्चापैकी ७५ टक्के रक्कम परकीय कर्जातून उभी केली जाईल.

टॅग्स :WaterपाणीIndiaभारतPakistanपाकिस्तान