उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे झटपट कॉम्प्युर शिका असा बोर्ड लावलेल्या क्लासमध्ये प्रत्यक्षात वेगळाच खेळ चालू असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर समोर आले. पोलिसांनी ज्या कॉम्प्युटर क्लासवर छापा मारला तिथे प्रत्यक्षात क्लास नव्हे तर स्पा सेंटर आणि इतर वाईट धंदे सुरू होते.
पोलिसांनी धाड टाकल्यावर कॉम्प्युटर क्लासच्या नावाखाली सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये ९ मुली सापडल्या. त्यामध्ये एक रिसेप्शनिस्टही होती. त्याबरोबरच पोलिसांनी तीन ग्राहकांना ताब्यात घेतलं असून, स्पा सेंटरच्या संचालकाताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
कुणाला संशय येऊ नये म्हणून या स्पा सेंटरच्या बाहेर कॉम्प्युटर क्लासचा बोर्ड लावण्यात आला होता. मात्र आत स्पा आणि इतर अनैतिक धंदे चालायचे. पोलिसांना याबाबत बऱ्याच काळापासून तक्रारी मिळत होत्या. या तक्रारींचं प्रमाण वाढल्यावर सिव्हिल लाईनचे सीओ अभिषेक तिवारी यांनी स्वत: कारवाईची सूत्रे हाती घेत इथे धाड टाकली.
पोलिसांची खात्री पटल्यावर नौचंदी, मेडिकल आणि सिव्हिल लाईन येथील पोलिसांच्या पथकांनी या कॉम्प्लेक्सवर संयुक्तरीत्या धाड टाकली. तिथे पोलिसांना पाहून एकच गोंधळ उडाला. तर आत जे दृश्य दिसले ते पाहून पोलिसही अवाक झाले. त्यानंतर तिथे असलेल्या तरुणी आणि पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेत आपल्यासोबत नेले.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर स्थानिक लोकही अवाक् झाले आहेत. बाहेरून पाहिल्यावर ही जागा अगदी सर्वसामान्य दिसत होती. तसेच येथे ये जा करणाऱ्या लोकांवरही कधी संशय आला नाही, असे काही जणांनी सांगितले.