आंदोलनात वकिलाची आत्महत्या; ‘मन की बात’ विरोधात शेतकऱ्यांचा थाळीनाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:30 AM2020-12-28T01:30:17+5:302020-12-28T07:00:49+5:30

संघर्ष तीव्र

Lawyer commits suicide in agitation | आंदोलनात वकिलाची आत्महत्या; ‘मन की बात’ विरोधात शेतकऱ्यांचा थाळीनाद

आंदोलनात वकिलाची आत्महत्या; ‘मन की बात’ विरोधात शेतकऱ्यांचा थाळीनाद

Next

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांवरून सरकार व शेतकरी संघटनांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाने आत्महत्या केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली. हरयाणातील बहादूरगडमध्ये अमरजीत सिंह यांनी विष प्राशन केले. रोहतकमधील सरकारी रूग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

मन की बात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी थाळी वाजवली.  तुमची मनकी बात सांगण्याऐवजी आमची मनकी बात ऐका, अशी  टीका किसान संघटनेेचे गौतम  सिंह यांनी केली. आंदोलनात  सहभागी झालेल्या वकिलाने आत्महत्या केल्याने रोष अजूनच वाढला. अमरजीत सिंह  जलालाबादचे रहिवासी आहेत. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी बलिदान देत असल्याचे त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते.

राकेश टिकैत यांच्याभाेवती कडे 

ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीने देशव्यापी संघर्षाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना मंगळवारी (२९ डिसेंबर) निदर्शने करण्याचे केले आहे. शेतकरी संघटनांचे प्रमुख राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमक्या येत असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. आंदोलनस्थळी त्यांच्याभोवती शेतकरी कडे करून उभे राहतात. पोलिसांनी धमकी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
 

Web Title: Lawyer commits suicide in agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.