The last moments of Sridevi: A 'surprise' dinner plan that turned into a horrific evening | श्रीदेवींची 'ती' शेवटची 30 मिनिटं, सरप्राईज डिनरसाठी मुंबईहून पुन्हा दुबईला गेले होते बोनी कपूर
श्रीदेवींची 'ती' शेवटची 30 मिनिटं, सरप्राईज डिनरसाठी मुंबईहून पुन्हा दुबईला गेले होते बोनी कपूर

मुंबई- बॉलिवूडची हवा-हवाई, ख्वाबो की शहजादी अशा एक ना अनेक नावांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांची अकाली एक्झिट प्रेक्षकांना चटका लावून जाणारी आहे. वयाच्या 54 व्या वर्षी एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवीचा मृत्यू झाला. पण मृत्यूच्या आधी अर्धा तासाचा वेळ श्रीदेवीने पती बोनी कपूर यांच्याबरोबर घालवला होता. दुबईतील लग्नसोहळा आवरून बोनी कपूर मुंबईत परतले होते. पण श्रीदेवी यांना सरप्राइज डिनर देण्यासाठी ते पुन्हा दुबईला गेले. म्हणूनच अभिनेत्रीच्या शेवटच्या वेळी त्यांना तिच्याबरोबर राहता आलं.

पती बोनी कपूर यांच्याबरोबर डिनर डेटवर जाण्यासाठी श्रीदेवी तयार व्हायला बाथरूममध्ये गेल्यावर त्याना कार्डिअॅक अरेस्टचा झटका आल्याचं वृत्त खलिज टाइम्सने दिलं आहे. कुटुंबीयाच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न सोहळ्यानंतर मुंबईला परतलेले बोनी कपूर 24 फेब्रुवारी रोजी सध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुन्हा दुबईत पोहचले. श्रीदेवी यांना त्यांच्या स्वप्नातील सरप्राईज डिनर डेटवर घेऊन जाण्यासाठी बोनी कपूर पुन्हा दुबईला गेले. 
 

बोनी कपूर दुबईतील जुमैरा एमिरेट्स टॉवरमधील श्रीदेवी यांच्या रूममध्ये पोहचल्यावर त्यांनी श्रीदेवी यांना उटवलं. त्यानंतर दोघांनी 15 मिनिटं गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना डिनर डेटसाठी विचारलं. डिनरला जायला तयार होण्यासाठी श्रीदेवी वॉशरूममध्ये गेल्या. जवळपास 15 मिनिटं त्या आतच होत्या. बराच वेळ होऊनही श्रीदेवी बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी दरवाजा वाजवला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्याने वॉशरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी बेशुद्धावस्थेत होत्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला व तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी मित्रांला फोन केला. रात्री नऊ वाजता यासंदर्भातील माहिती पोलिसांना समजली. 

श्रीदेवी सहकुटुंबासह दुबईमध्ये भाचा मोहीत मारवाह याच्या विवाहासाठी गेल्या होत्या. श्रीदेवी, पती बोनी कपूर व मुलगी खुशी तिघेही दुबईत होते. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी सिनेमातील शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने लग्नाला गेली नव्हती. लग्नसोहळ्यानंतर पती व मुलगी मुंबईला परतले पण शॉपिंग व बहिणीबरोबर राहण्यासाठी श्रीदेवी दुबईत थांबल्या होत्या.

दरम्यान, श्रीदेवी यांचं पार्थिव काही तासांतच दुबईहून मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे खासगी चार्टर्ड प्लेन दुबईमध्ये दाखल झाले आहे. मुंबईतील वर्सोवा येथील भाग्य बंगल्यात श्रीदेवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझमध्ये अंत्यसंस्कार होतील.
 

Web Title: The last moments of Sridevi: A 'surprise' dinner plan that turned into a horrific evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.