Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:53 IST2025-11-17T12:52:24+5:302025-11-17T12:53:14+5:30

Rohini Acharya And Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीतील निकालानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद समोर आले आहेत. याच दरम्यान रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा विषारी व्यक्ती असं म्हणत भावुक स्टोरी शेअर केली.

lalu yadav daughter rohini acharya again posted an emotional post on poisonous person in family | Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट

Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट

बिहार विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद आता समोर आले आहेत. याच दरम्यान रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा विषारी व्यक्ती असं म्हणत एक भावुक स्टोरी शेअर केली आहे. अत्यंत कठोर शब्दांचा वापर करून रोहिणी यांनी अशी व्यक्ती निश्चितच त्याचे खरे रंग दाखवतो असं म्हटलं आहे. कुटुंबातील या वादाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. "कुटुंबात एक विषारी माणूस नक्कीच असतो जो तुम्ही त्याला कितीही आदर दिला तरी तो कधीही तुमचा आदर करणार नाही. तो बिचारा असल्याचं भासवेल आणि तुमच्यावर सर्व गोष्टींचा आरोप करत राहिल."

"जेव्हा त्याचं तुमच्याकडे काही काम असेल, त्याचा काही स्वार्थ असेल, तेव्हा तो दोन-तीन दिवस आधी असं वागेल जसं काहीही झालेलं नाही. मात्र जसं त्याचं काम पूर्ण होईल तेव्हा तो पुन्हा त्याचे खरे रंग दाखवेल. अशा लोकांपासून सावध राहा" असं रोहिणी आचार्य यांनी इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून म्हटलं आहे.

"मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट

रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर रविवारी पोस्ट शेअर करत संजय यादव आणि रमीज यांच्यावर गंभीर आरोप केले. "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मला मारण्यासाठी चप्पल उचलली. मी ढसाढसा रडत आई-वडिलांचं घर सोडलं" असं रोहिणी यांनी म्हटलं होतं. "काल, एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आलं... घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या, मला मारण्यासाठी चप्पल उचलण्यात आली."

"मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, मी सत्याची साथ सोडली नाही आणि म्हणूनच मला अपमान सहन करावा लागला... काल, एक मुलीला तिच्या रडणाऱ्या आईवडिलांना आणि बहिणींना सोडून आली. मला माझं माहेर सोडण्यास भाग पाडललं... मला अनाथ करण्यात आलं... तुम्ही सर्वजण कधीही माझ्यासारख्य़ा या मार्गावर येऊ नये, रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याच घरात जन्माला येऊ नये" असं रोहिणी यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Web Title : लालू प्रसाद यादव की बेटी ने परिवार के सदस्य पर जहरीला होने का आरोप लगाया।

Web Summary : रोहिणी आचार्य के इंस्टाग्राम पोस्ट से पारिवारिक कलह का पता चलता है। उन्होंने परिवार के एक सदस्य पर जहरीला, जोड़-तोड़ करने वाला और दयालुता के बावजूद अनादर करने का आरोप लगाया, जिससे विवाद बढ़ गया। उन्होंने पहले कथित दुर्व्यवहार और अनाथ महसूस करने का वर्णन किया था।

Web Title : Lalu Prasad Yadav's daughter accuses family member of being toxic.

Web Summary : Rohini Acharya's Instagram post reveals family discord. She accuses a family member of being toxic, manipulative, and disrespectful despite kindness, stirring controversy. She earlier described alleged abuse and feeling orphaned.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.