ऐश्वर्या राय होणार लालूंची सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 15:13 IST2018-04-06T15:13:21+5:302018-04-06T15:13:28+5:30

पुढील महिन्यात संपन्न होणार विवाह सोहळा

Lalu Prasads son Tej Pratap Yadav set to marry Aishwarya Rai | ऐश्वर्या राय होणार लालूंची सून

ऐश्वर्या राय होणार लालूंची सून

चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या लालू प्रसाद यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रताप यादव पुढील महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय आणि राष्ट्रीय जनता दलाच्या आमदार चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या राय लालूंची सून होणार आहे. 

तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचा साखरपुडा 18 एप्रिल रोजी होणार आहे. पटनातील मोर्या हॉटेलमध्ये हा सोहळा संपन्न होईल. या कार्यक्रमाला लालू प्रसाद यादव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप यावर राष्ट्रीय जनता दलाकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. 12 मे रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. ऐश्वर्या रायचे वडील चंद्रिका राय बिहार सरकारमध्ये माजी मंत्री होते.  दरोगा राय 16 फेब्रुवारी 1970 ते 12 डिसेंबर 1970 या कालावधीत बिहारचे नेतृत्त्व केले. 

लालू प्रसाद आणि राबडी देवी यांच्या सात मुली विवाहित आहेत. मध्यंतरी लालूंचा मुलगा तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्या लग्नाची मोठी चर्चा होती. मला मॉलमध्ये जाणारी सून नको, असे राबडी देवी यांनी म्हटले होते. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी रस्त्यासंदर्भातील तक्रारी करण्यासाठी एक व्हॉट्स अॅप नंबर सुरु केला होता. त्या क्रमांकावर तेजस्वी यादव यांना अनेकांनी लग्नाची मागणी घातली होती. तेव्हापासून तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्या लग्नाची चर्चा होती. 

Web Title: Lalu Prasads son Tej Pratap Yadav set to marry Aishwarya Rai