शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

यादव कुटुंबावर कोसळले आभाळ, लालूंना शिक्षा झाल्याच्या धक्क्याने बहिणीचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 6:02 PM

या घटनेमुळे यादव कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. शनिवारी लालू यांना शिक्षा सुनावली जाणार होती. यामुळे गंगोत्री दिवसभर लालू यांच्यासाठी प्रार्थना करत होत्या.

पाटणा -  लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याचे ऐकून त्यांची बहीण गंगोत्री देवी यांना जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्या 75 वर्षाच्या होत्या. या घटनेमुळे यादव कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. शनिवारी लालू यांना शिक्षा सुनावली जाणार होती. यामुळे गंगोत्री दिवसभर लालू यांच्यासाठी प्रार्थना करत होत्या. पण लालू यांना साडेतीन वर्षांची शिक्षा झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला. अखेरीस रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गंगोत्री यांचे निधन झाल्याचे कळताच लालू यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घरी धाव घेतली. ही आमच्या कुटुंबासाठी दुखद घटना आहे. असे लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

(आणखी वाचा - लालू म्हणतात जेलमध्ये किन्नर विचारतो, माझ्याशी लग्न करणार का ?, न्यायालयात हास्यकल्लोळ )

दरम्यान, लालू यांना बहिणीच्या अंत्यसंस्कारात सामील होता यावे यासाठी त्यांचे वकिल पॅरोलसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. पण रविवार असल्याने अडचण असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. लालू यांना सहा भाऊ असून गंगोत्री देवी त्यांची एकुलती एक बहीण होती. चारा घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालू यांना दोषी ठरवल्यापासून गंगोत्री बैचेन होत्या.

(आणखी वाचा - लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार )

गंगोत्री यांच्या तीन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे बिहार पोलीस व रेल्वेत नोकरीस आहेत. पाटण्यातील प्राण्यांच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरमध्ये त्या राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सतत लालू यांना पैसेवाल्यांनी फसवलं असं बरळत होत्या.

लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम - 

साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना  हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे.  तुरुंगात एक कैदी म्हणून लालू यादव यांना माळीकाम देण्यात आले असून, त्यासाठी त्यांनी वेतनही मिळणार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार लालू यादव यांना माळीकामासाठी दररोज 93 रुपये एवढा मेहनताना मिळणार आहे. 

काय आहे चारा घोटाळापूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाºयाचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता. या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल. गेले दोन आठवडे लालू बिरसा मुंडा कारागृहात आहेत.  

 

टॅग्स :Fodder scamचारा घोटाळाLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादव