लालू प्रसाद यादव यांच्या घरी 'गुड न्यूज'; तेजस्वी यादवांना कन्यारत्न! लेकीचा गोंडस Photo केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:47 IST2023-03-27T11:47:01+5:302023-03-27T11:47:34+5:30

Tejashwi Yadav Baby: डिसेंबर २०२१ मध्ये राजश्री यांच्याशी झालं होतं लग्न

Lalu Prasad Yadav son Bihar Deputy CM Tejashwi Yadav blessed with baby girl shares daughter adorable photo | लालू प्रसाद यादव यांच्या घरी 'गुड न्यूज'; तेजस्वी यादवांना कन्यारत्न! लेकीचा गोंडस Photo केला शेअर

लालू प्रसाद यादव यांच्या घरी 'गुड न्यूज'; तेजस्वी यादवांना कन्यारत्न! लेकीचा गोंडस Photo केला शेअर

Tejashwi Yadav blessed with Baby Girl: राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या घरातून 'गुड न्यूज' आली असून त्यांचा मुलगा, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे वडील झाले आहेत. त्यांची पत्नी राजश्री यादव यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही माहिती स्वतः तेजस्वी यादव यांनी ट्विट करून दिली. त्यांनी मुलीसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'देवाने कन्यारत्नाच्या रूपात आम्हाला आनंदाने भेट पाठवली आहे.'

तेजस्वीच्या बहिणीनेही शेअर केला फोटो

तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य हिनेही एक फोटो ट्विटरवर शेअर करत आपल्या भावाच्या घरी कन्यारत्न प्राप्ती झाल्याची माहिती दिली. फोटो शेअर करताना तिने लिहिले, 'भाऊ आणि वहिनीच्या चेहऱ्यावर हसू असेच असावे. माझ्या घरात असाच आनंद सदैव राहो. मन आनंदाच्या सागरात राहो. बाप झाल्याच्या आनंदात भाऊ तेजस्वीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, तो सदैव असाच असो.'

डिसेंबर २०२१ मध्ये झाले लग्न

तेजस्वी यादवने डिसेंबर २०२१ मध्ये राजश्री यादवसोबत लग्न केले. दोघेही एकमेकांना आधी ओळखत होते आणि राजधानी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या वेळी लालू कुटुंबीय तेजस्वी आणि राजश्रीच्या लग्नासाठी तयार नसल्याचे समोर आलं होतं, पण नंतर सगळ्यांनी होकार दिला आणि दोघांनीही घरच्यांच्या संमतीनं लग्न केलं.

राजश्री मूळची दिल्लीची

तेजस्वी यादव यांची पत्नी राजश्री दिल्लीची रहिवासी असून दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. राजश्रीचे वडील चंदीगडमधील एका शाळेचे प्राचार्य आहेत. लग्नापूर्वी राजश्री मल्टीनॅशनल युनिव्हर्सल बँक बार्कलेजमध्ये काम करत होती. तिने लग्नासाठी नोकरीतून ब्रेक घेतला होता.

Web Title: Lalu Prasad Yadav son Bihar Deputy CM Tejashwi Yadav blessed with baby girl shares daughter adorable photo