'दिल्लीत मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर न्यायला हवेत', म्हणणारा लक्खा सिधाना आहे तरी कोण?; जाणून घ्या!

By मुकेश चव्हाण | Published: January 27, 2021 12:04 PM2021-01-27T12:04:50+5:302021-01-27T12:11:21+5:30

लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे

Lakkha Sidhana's name has come to the fore in the violence that took place in Delhi on Tuesday.Who is Lakkha Sidhana who says, 'We need to take a large number of tractors in Delhi' ?; Find out! | 'दिल्लीत मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर न्यायला हवेत', म्हणणारा लक्खा सिधाना आहे तरी कोण?; जाणून घ्या!

'दिल्लीत मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर न्यायला हवेत', म्हणणारा लक्खा सिधाना आहे तरी कोण?; जाणून घ्या!

Next

नवी दिल्ली:  गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी (मंगळवारी) काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे.

लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. याच दरम्यान आता या हिंसाचारात लक्खा सिधाना याचं नाव पुढे आलं आहे. या संबंधित पोलिसांनी लक्खा सिधानाची चौकशी सुरु केली आहे. सिंघू सीमेवरील हिंसाचारात लक्खा सिधानाचा हात आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. 

लक्खा सिधानाचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पंजाबच्या गावांमधील लोकांना तो भडकवताना दिसत आहे. तसेच सरकारला झुकवायचं असेल तर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत जायला हवं, असं सांगतानाही तो या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओतून लक्खा सिधाना केवळ शेतकऱ्यांनाच भडकावत नाही तर मीडियालाही धमकावत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ 17 जानेवारीचा आहे. आपण समाजसेवक असल्याचं सांगणाऱ्या लक्खा सिधानावर पंजाबमध्ये दोन डझनपेक्षाही गुन्हे दाखल आहेत. हत्या, अपहरण, खंडणी आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. 

सध्या लक्खा सिधानाने स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेण्यास सुरुवात केली. त्यासाठीच तो शेतकरी आंदोलनात आला होता असं सांगितलं जातं. काही दिवसांपूर्वीच बठिंडा पोलिसांनी त्याला लखनऊ हायवेवर एका साईन बोर्डला काळं फासलं म्हणून अटक केली होती. पंजाबमध्ये साईन बोर्ड केवळ पंजाबी भाषेत असावेत अशी मागणी लक्खा सिधानाने केली होती.

दिल्लीत मंगळवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी 15 FIR नोंदविण्यात आल्या असून त्यातील 5 FIR ईस्टर्न रेन्जमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. याशिवाय नजफगड, हरिदास नगर आणि उत्तम नगरमध्ये प्रत्येकी एक एफआयआर नोंदविण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर गृह मंत्रालयाने दिल्लीच्या काही भागांत इंटरनेट सेवा बंद केली आहे.

दरम्यान, दिल्ली पोलीस आता सीसीटीव्ही फुटेडच्या माध्यमाने निदर्शनकर्त्यांचा शोध घेत आहे. यासाठी, लाल किल्ला, नांगलोई, मुकरबा चौक आणि सेंट्रल दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज काढण्यासाठी स्पेशल सेल आणि क्राइम ब्रांचची मदत घेतली जात आहे. यात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर, लाल किल्ल्यावर चढणाऱ्यांवर आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असेल. याच बरोबर, ज्यां नेत्यांनी शेतकऱ्यांना भडकावले अशा नेत्यांवरही पोलिसांची नजर असणार आहे.

दिप सिद्धूवरही आरोप-

शेतकरी नेत्यांनी दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. त्यावर दिप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही", असं दिप सिद्धू यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यानं फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

दिप सिद्धू गेल्या नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय आहेत. "आंदोलनामुळे लोकांचा रोष वाढला आणि आंदोलकांना भडकवण्यासाठी कुठल्या एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आमचे शेतकरी प्रदर्शन करत आहेत आणि आज जे झालं ते त्याला वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जाऊ शकत नाही", असं दिप सिद्धू म्हणाले. 

Web Title: Lakkha Sidhana's name has come to the fore in the violence that took place in Delhi on Tuesday.Who is Lakkha Sidhana who says, 'We need to take a large number of tractors in Delhi' ?; Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.