शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बॅंकेत सडले तब्बल ४२ लाख रूपये, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:52 IST

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बॅंकेतील ४२ लाख रूपयांची रक्कम सडली आहे.

नवी दिल्ली : सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बॅंकेतील ४२ लाख रूपयांची रक्कम पावसाच्या ओलसरपणामुळे सडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे या नोटांची दुरावस्था होत असल्याची अधिकाऱ्यांना देखील माहिती नव्हती. ही बाब उघडकीस येताच चार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील कानपूरमधील पंजाब नॅशनल बँकेच्या पांडू नगर शाखेत करन्सी चेस्टमध्ये ठेवलेले लाखो रुपये सडले आहेत. अधिकाऱ्यांनी ही रक्कम लपवली होती मात्र जेव्हा जुलै महिन्याचे ऑडिट आरबीआयने केले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. यामध्ये पेट्यांमध्ये ठेवलेल्या ४२ लाख रुपयांच्या नोटा ओल्या झाल्याने सडल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ व्यवस्थापकासह चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यापैकी तीन अधिकारी असे आहेत जे काही दिवसांपूर्वीच पीएनबीच्या पांडू नगर शाखेत बदली होऊन आले आहेत. 

आरबीआयच्या तपासणीत धक्कादायक बाब उघड आरबीआयने २५ जुलै ते २९ जुलै या कालावधीत शाखेच्या चेस्ट करन्सीची तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. कारण यामध्ये जास्तीत जास्त १४ लाख ७४ हजार ५०० रूपये आणि किमान १० लाख रूपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय १० रूपयांच्या ७९ बंडल आणि २० रूपयांच्या ४९ बंडलचे नुकसान झाल्याची माहिती आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्यानंतर पुन्हा मोजणी केली असता ४२ लाख रूपयांच्या नोटा सडल्याचे निदर्शनास आले. 

शाखा व्यवस्थापकाचे निलंबन हे संपूर्ण प्रकरण गंभीर असल्यामुळे या कारवाईवर काही लोक आणि बँक कर्मचारी संघटनेचे नेतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत आहेत. तर देवीशंकर हे वरिष्ठ व्यवस्थापक करन्सी चेस्ट असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ते २५ जुलै रोजी बदली होऊन या शाखेत आले आहेत मात्र नोटा सडण्याची ही घटना त्यापूर्वीची आहे. बॅंकेतील नोटांच्या पेट्या मोठ्या तिजोरीत ठेवल्या जात नव्हत्या आणि रोकड येते तेव्हा ती सतत पेटीत भरून चेस्ट करेंसी अंडर ग्राउंडमध्ये ढकलली जायची. त्यामुळे या नोटा सडलेल्या अवस्थेत मिळाल्या. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकbankबँकMONEYपैसाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक