शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpura Protest : प्रियंका गांधींनी Priyanka Gandhi स्वत: झाडू मारुन स्वच्छ केली खोली, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 13:39 IST

Lakhimpura Protest : Priyanka Gandhi cleans the room with a broom herself, video goes viral : केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देप्रियंका गांधींना पोलिसांनी लखनौपासून 90 किमी अंतरावर असलेल्या सितापूर येथे स्थानबद्ध केलं आहे. प्रियंका गांधींचा पोलिसांसोबत संवाद आणि वाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसकडून आता आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे

मुंबई - वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. आता उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात मंत्र्यांच्या मुलाची कार शिरल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधींनापोलिसांनी अटक केल्याचे माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली होती. आता प्रियंका गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा, व्हिडिओ पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केला तेथील आहे.  Lakhimpura Protest : Priyanka Gandhi cleans the room with a broom herself, video goes viral

प्रियंका गांधींना पोलिसांनी लखनौपासून 90 किमी अंतरावर असलेल्या सितापूर येथे स्थानबद्ध केलं आहे. प्रियंका गांधींचा पोलिसांसोबत संवाद आणि वाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसकडून आता आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये, प्रियंका गांधींच्या हातात झाडू दिसत आहे. स्वत: झाडूने रुम साफ करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी त्यांना सितापूर येथील ज्या गेस्ट हाऊसमध्ये स्थानबद्ध केलंय, तिथला हा व्हिडिओ आहे. दरम्यान, या गेस्ट हाऊसच्याबाहेर काँग्रेस समर्थक जमले असून पोलिसांकडून अन्याय होत असून प्रियंका गांधींच्या सुटकेची मागणी ते करत आहेत. 

केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता, लखीमपूर येथील शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला. 

काय आहे घटना ?

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली आणि केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. मंत्र्याच्या मुलाचं नाव आशिष मिश्रा असं आहे. तर, आंदोलक शेतकऱ्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. त्याच घटनेत भाजपच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचाही आरोप भाजप समर्थकांकडून होत आहे.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीlakhimpur-pcलखीमपुरFarmers Protestशेतकरी आंदोलनPoliceपोलिस