प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:23 IST2025-08-28T13:21:22+5:302025-08-28T13:23:01+5:30
जास्मिन आणि रुखसाना बानो यांनी रामप्रवेश आणि सर्वेश यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं.

प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात दोन मुस्लिम बहिणींनी एका मंदिरात हिंदू मुलांशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. जास्मिन आणि रुखसाना बानो यांनी रामप्रवेश आणि सर्वेश यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. त्यांचं प्रेमप्रकरण खूप दिवसांपासून सुरू होतं. रुखसानाने आता तिचं नाव बदलून रूबी ठेवलं आहे आणि जास्मिनने चांदणी असं नाव ठेवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दोन्ही बहिणी आपलं घर सोडून थेट रामप्रवेश आणि सर्वेशच्या घरी पोहोचल्या. मुली अचानक आल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. हे कसं घडलं याचा विचार गावकरी आणि कुटुंबातील सदस्य करू लागले. लोक हे प्रकरण सोडवण्यासाठी एकत्र आले. गावात तणावाचं वातावरण होतं, परंतु दोन्ही बहिणी लग्न करण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या.
सोमवारी सकाळी गावातील वडीलधाऱ्यांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी पंचायत बोलावली. दोन्ही कुटुंबांमध्ये नीट चर्चा व्हावी अशी सर्वांना इच्छा होती, परंतु कोणताही तोडगा निघू शकला नाही. कारण दोन्ही बहिणी त्यांच्या प्रियकराशीच लग्न करण्याच्या मुद्द्यावर ठाम होत्या. त्यांच्या हट्टीपणासमोर पंचायतही अपयशी ठरली. मुलींचं वय तपासलं असता त्या प्रौढ असल्याचं आढळून आलं.
पंचायतीत काहीही निर्णय न झाल्याने दोन्ही बहिणी आणि त्यांच्या प्रियकरांनी आनंदाने हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. जास्मिन आणि रुखसाना यांनी त्यांचा धर्म सोडून आपलं प्रेम निवडलं. या निर्णयाने दोन्ही कुटुंबांनाच नव्हे तर संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. या लग्नाची सध्या परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.