Lakhimpur Kheri Violence : "लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 03:28 PM2021-10-05T15:28:33+5:302021-10-05T15:34:32+5:30

Lakhimpur Kheri Violence : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता त्याठिकाणी मुलगा आशिष नव्हताच असा दावा अजय मिश्रा यांनी यापूर्वी केला आहे.

Lakhimpur Kheri Violence union minister ajay mishra teni told i will resign if single proof my son | Lakhimpur Kheri Violence : "लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन"

Lakhimpur Kheri Violence : "लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन"

Next

नवी दिल्ली - लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती. आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. याच दरम्यान आता अजय मिश्रा टेनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"आपला मुलगा आशिष मिश्रा लखीमपूर खिरी येथे झालेल्या भीषण हिंसाचाराच्या ठिकाणी असल्याचं सिद्ध करणारे कोणतेही पुरावे समोर आले तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईन" असं आता अजय मिश्रा टेनी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता त्याठिकाणी मुलगा आशिष नव्हताच असा दावा अजय मिश्रा यांनी यापूर्वी केला आहे. तो इतरत्र एका कार्यक्रमाला उपस्थित होता याचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे आहेत असं म्हटलं होतं. त्यानंतर आता अजय मिश्रा टेनी यांनी "माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे मिळाले तर राजीनामा देईन" असं म्हटलं आहे. 

"मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीस तयार"

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेणी यांचा मुलगा आशिष मिश्रा आज अखेर प्रसारमाध्यमांसमोर आला. यावेळी त्याने आपली बाजू मांडताना आपण घटनास्थळी नसल्याचा दावा केला आहे. तसेच मी तिथे असतो तर आज जिवंत नसतो, असा दावा केला आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये लखीमपूर खीरी हिंसाचाराबाबत आशिष मिश्रा याने स्वत:चा बचाव केला आहे. तो म्हणाला की, या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी. मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीस तयार आहे. ईश्वराचा आशीर्वाद म्हणून सुदैवाने मी तिथे नव्हतो. जर तिथे असतो तर आज मी इथे तुमच्यासमोर नसतो.

"जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्या गावात होतो"

लखीमपूरमधील हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आपण घटनास्थळी नसल्याचा दावा तो करत आहे. तो म्हणाला की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्या गावात होतो. तिकोनिया येथे गेलो नव्हतो. आमच्या तीन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून जिवे मारण्यात आले. तर ड्रायव्हरला जळत्या गाडीत ढकलण्यात आले. भारतातील शेतकरी असं करू शकत नाही. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून 25 सप्टेंबर रोजी हे आंदोलन सुरू झाले होते. एका कार्यक्रमाला जाताना अजय मिश्रा यांना आंदोलक शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी वेळीच सुधरावं, अन्यथा त्यांना सुधारले जाईल, असा इशारा दिला होता. तेव्हापासून केंद्रीय मंत्र्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. 
 

Web Title: Lakhimpur Kheri Violence union minister ajay mishra teni told i will resign if single proof my son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.