लडाखचे प्रवेशद्वार द्रास
By Admin | Updated: January 17, 2017 05:28 IST2017-01-17T05:28:00+5:302017-01-17T05:28:00+5:30
लडाखचे प्रवेशव्दार असा ज्याचा उल्लेख केला जातो ते ठिकाण म्हणजे द्रास.

लडाखचे प्रवेशद्वार द्रास
लडाखचे प्रवेशव्दार असा ज्याचा उल्लेख केला जातो ते ठिकाण म्हणजे द्रास. जम्मू - काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यापासून ६२ किमी अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून ३२८० मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून याची ओळख तर आहेच पण, भारत आणि पाकिस्तानात १९९९ ला झालेल्या युद्धाचे हेच ते ठिकाण आहे. द्रासच्याजवळ सुरू व्हॅलीत ट्रॅकिंगही करता येईल. येथे ‘द्रास वॉर मेमोरियल’ पाहण्यासारखे आहे. कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली म्हणून हे स्थापन करण्यात आले आहे. या युद्धात दोन्हीकडील १२०० सैनिक मारले गेले होते, असे सांगितले जाते. येथील द्रौपदी कुंडालाही पर्यटन आवर्जून भेट देतात. विमान, रेल्वे, बस आणि अन्य वाहनाने येथे पोहचता येते. जून ते सप्टेंबर हा येथे जाण्याचा सर्वात चांगला काळ समजला जातो. या काळात येथील तापमान तुलनेने अधिक असते. जगातील प्रमुख थंड हवेच्या ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे.