"ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा ...", कुरुक्षेत्रातील खाप महापंचायतीनंतर राकेश टिकैत यांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 07:15 PM2023-06-02T19:15:44+5:302023-06-02T19:16:43+5:30

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा आंदोलन करू, अशी घोषणा केली. 

kurukshetra wrestler justice issue rakesh tikait demands arresting of brij bhushan singh again in khap panchayat | "ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा ...", कुरुक्षेत्रातील खाप महापंचायतीनंतर राकेश टिकैत यांचा अल्टिमेटम

"ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा ...", कुरुक्षेत्रातील खाप महापंचायतीनंतर राकेश टिकैत यांचा अल्टिमेटम

googlenewsNext

कुरुक्षेत्र : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित लैंगिक शोषण प्रकरणात कुस्तीपटूंच्या पाठिंब्याचा मुद्दा देशभर तापत आहे. हरयाणात शुक्रवारीही खाप पंचायतीची बैठक झाली. यादरम्यान, कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या खाप पंचायतमध्ये गदारोळ झाला. यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा आंदोलन करू, अशी घोषणा केली. 

कुरुक्षेत्रात राकेश टिकैत यांचे हे मोठे वक्तव्य समोर आले. ब्रिजभूषण यांना अटक न झाल्यास आम्ही पुन्हा खेळाडूंना जंतरमंतरवर सोडून येऊ, असे ते म्हणाले. तसेच, राकेश टिकैत म्हणाले की, ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक झाली नाही, तर देशभरात आंदोलन करण्यात येईल. तत्पूर्वी शुक्रवारी, हरयाणातील कुरुक्षेत्र येथील जाट धर्मशाळेत कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खापांची सर्व-जातीय सर्व खाप महापंचायत झाली. 

या महापंचायतीत खाप कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मोठा निर्णय घेऊ शकतात, असे बोलले जात होते. दरम्यान, सोनीपतच्या राठधाना गावात झालेल्या सारोहा खापच्या 12 गावांच्या पंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. या खापमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांना लवकर अटक करून मुलींना लवकर न्याय मिळावा, असे  सारोहा खापने म्हटले आहे.

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेवर कुस्तीपटू ठाम आहेत. गेल्या मंगळवारी साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटू आपल्या पदकांचे विसर्जन करण्यासाठी समर्थकांसह हरिद्वार येथे पोहोचले होते. मात्र, शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना वाटेत अडवून समज दिली. यानंतर कुस्तीपटूंनी आपले पदक नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केले. 

या सोबतच कुस्तीपटूंनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. याशिवाय, यापूर्वी 29 मे रोजी कुस्तीपटू संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी सर्व कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. तसेच, त्याचवेळी कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलनासाठी लावलेले तंबू  पोलिसांनी हटवले होते. 

Web Title: kurukshetra wrestler justice issue rakesh tikait demands arresting of brij bhushan singh again in khap panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.